अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 09:03 AM2019-08-03T09:03:51+5:302019-08-03T09:03:59+5:30

ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यांतल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

Holiday, district authorities announce all schools and colleges in Thane district due to heavy rains | अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

Next

ठाणे- मुंबईसह ठाणे उपनगरांत आज मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. तसेच तिन्ही मार्गांवरची लोकल सेवाही संथ गतीनं सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यांतल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून पडणाऱ्या पावसाची तीव्रता लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा-कॉलेजला सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनीसुद्धा शक्यतो घराबाहेर पडू नये आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Web Title: Holiday, district authorities announce all schools and colleges in Thane district due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.