गृहविलीगकरणातील रुग्णांचा कचरा उचलाच जात नाही! महासभेत उघड झाली बाब, प्रशासनाची पंचाईत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 04:54 PM2021-05-20T16:54:46+5:302021-05-20T16:55:06+5:30
ज्या रुग्णांना सौम्य किंवा लक्षणो नसतात अशा रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत. परंतु त्यांच्याकडून निर्माण होणारा बायोमेडीकल वेस्ट उचलला जात असल्याचा दावा महापालिकेच्या प्रदुषण नियमंत्रण विभागाने केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ज्या रुग्णांना सौम्य किंवा लक्षणो नसतात अशा रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत. परंतु त्यांच्याकडून निर्माण होणारा बायोमेडीकल वेस्ट उचलला जात असल्याचा दावा महापालिकेच्या प्रदुषण नियमंत्रण विभागाने केला होता. परंतु त्यांचा हा दावा बुधवारी झालेल्या महासभेत सर्व पक्षीय नगरेसवकांनी फोल ठरविल्याचे दिसून आले आहे. अशा रुग्णांच्या घरातील कचरा उचलला जात नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्यामुळे कचरा गोळा केला जात नसेल तर संबधित संस्थेला बिल का अदा करायचे असा प्रश्न उपस्थित करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली. त्यामुळे या संस्थेचा वाढीव खर्चाचा प्रस्ताव तहकूब ठेवण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
कोरोनापासून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे निर्मुलन करण्याचे काम मे.मुंबई वेस्ट मनेजमेंट आणि मे.एन्व्हायरो व्हीजील या दोन संस्थाना ६ महिन्याचा कालावधीसाठी देण्यात आले आहे. यासाठी १ कोटींच्या खर्चाला मान्यता देखील देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थाना अनुक्र मे ५० लाखांच्या कामांचा कार्यादेश देण्यात आला आहे. ठाणो महापालिकेचे कोवीड हॉस्पीटल, कोवीड सेंटर आणि आयसोलेशन सेन्टर्समध्ये निर्माण होणारा कचरा संकलित करून या कच:याचे निर्मुलन करण्याची जबाबदारी मे. मुंबई वेस्ट मनेजमेंट या संस्थेवर देण्यात आली आहे . तर अँटीजन सेन्टर्स आणि होम आयसोलेशनमध्ये असणा:यांकडून कचरा संकलित करण्याचे काम एन्व्हायरो व्हीजील या संस्थेला देण्यात आले आहे. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दोन्ही संस्थाचा १ कोटी ५० लाखांचा वाढीव बिलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आल्यानंतर एन्व्हायरो व्हीजील संस्थेच्या कारभारावरच नगरसेवकांकडून टीका करण्यात आली.
शिवसेनेच्या नगरसेविका रु चिता मोरे, नगरसेवक विकास रेपाळे, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी गृह विलीगकरणात असणा:या रुग्णांकडून कचरा उचललाच जात नसल्याची माहिती सभागृहात उघड केली. ठाणो महापालिकेच्या प्रदूषण अधिकारी मनीषा प्रधान यांनी होम आयसोलेशन असणाऱ्यांकडून कचरा संकलित करण्यासाठी मेडिकलची टीम तसेच एक गाडी प्रभागात फिरत असल्याची माहिती दिली. तसेच या मेडिकल टीम कडून घरी असणा:यांसाठी कचर्यासाठी पिशव्या देखील देण्यात येत असल्याचे संगीतले. मात्र आतापर्यंत होम आयसोलेशन असणा:यांकडून किती कचरा संकलित केला असा सवाल विकास रेपाळे यांनी उपस्थित केल्यानंतर मनीषा प्रधान यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. मार्च २०२० ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत एकूण १२ हजार ७८० किलो कचरा संकलित करण्यात आला असल्याचे प्रधान यांनी सांगितले. मात्र होम आयसोलेशन असणा:यांकडून किती कचरा संकलित केला याची माहिती प्रधान यांना देता आली नाही. तर दुसरीकडे नगरसेवकांकडेच कोणीही फिरकले नाही तर सर्वसमान्य नागरिकांचे काय असा प्रश्न उपस्थित करून हा प्रस्ताव तहकूब ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी सदरचा प्रस्ताव तहकूब ठेवत असल्याचे जाहीर केले.
मे. मुंबई वेस्ट मनेजमेंट आणि मे एनव्हायरो व्हीजील या दोन संस्थाचे नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ वाढीव रक्कम अनुक्र मे ४१ लाख १० हजार तसेच १० लाख ६४ असे एकूण ५४ लाख ७५ हजार एवढी वाढीव रक्कम आहे. रु ग्णसंख्या वाढत असल्याने पुढील सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत कोविडचा कचरा संकलित करण्यासाठी आणि निर्मुलनासाठी पुढील सहा महिन्याच्या कालावधीसाठी मे. मुंबई वेस्ट मनेजमेंट आणि मे. एनव्हायरो व्हीजील यांनी ७० लाख आणि २५ लाख असे एकूण ९५ लाखांची रक्कम आवश्यक असून त्या अनुषंगाने १ कोर्टी ५० लाख वाढीव खर्चाचा प्रस्ताव ठाणो महापालिकेने सर्वसाधारण सभेत आणला होता.