घर, सोसायटीच्या आवारात रुग्णांकडील कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 12:01 AM2020-05-31T00:01:52+5:302020-05-31T00:01:59+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती । ठाणे महापालिका प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष

Home, piles of rubbish from patients in the Society's premises | घर, सोसायटीच्या आवारात रुग्णांकडील कचऱ्याचे ढीग

घर, सोसायटीच्या आवारात रुग्णांकडील कचऱ्याचे ढीग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोना रुग्णांच्या घरातील कचरा दररोज संकलित करण्यात महापालिकेने दुर्लक्ष केल्याने त्याघरासह सोसायटीच्या आवारात कचºयाच्या पिशव्यांचे ढीग लागले आहेत. आठ-आठ दिवस महापालिकेची गाडी तो घेण्यासाठी फिरकत नसून अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्यामुळे संपूर्ण सोसायटीत कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे.


कोरोनाचा रुग्ण आढळलेले घर महापालिका सील केले करते किंवा रुग्णास होम क्वॉरंटाइन करते. त्यानंतर रुग्णाने वापरलेले मास्क, ग्लोज हे वैद्यकिय साहित्यासह ओला व सुका कचरा सरसकट फेकून न देता वेगळा ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. हा कचरा दररोज संकलित करून त्याची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावण्याचे सांगितले आहे. मात्र, घोडबंदर रोडबरोबरच ठाणे शहरातील काही सोसायट्यांमध्ये आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांचा कचरा घरातच पडून आहे. काही ठिकाणी सोसायट्यांच्या आवारात त्याच्या पिशव्यांचे ढीग ठेवल्या आहेत. यामुळे संपूर्ण सोसायटी कोरोनाग्रस्त होण्याची भीती आहे, याकडे या प्रकाराबद्दल भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे लक्ष वेधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनाही पत्र पाठवून दखल घेण्याची मागणी केली आहे.


रुग्णाच्या घरातील कचरा दररोज उचलण्यासाठी मनपा अधिकाºयांकडे संपर्क साधल्यानंतर, आज ड्रायव्हर नाही, तर उद्या गाडी पाठवितो, अशी कारणे सांगून टाळाटाळ केली जाते. शहरात कोरोना नियंत्रणात येत नसताना अशा बेफिकरीमुळे आणखी फैलाव होण्याची भीती व्यक्त आहे.
‘खाजगीदुकानदारी' सुरू : कोरोना रुग्णांचा कचरा उचलण्याकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याने खाजगी दुकानदारी सुरू झाली आहे. काही सोसायट्यांमध्ये रुग्ण तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांकडूनच तो उचलण्यासाठी खाजगी व्यक्तींचे क्रमांक दिले जात असल्याचा प्रकार घडला आहे.
या व्यक्तींकडून कचरा उचलण्यासाठी पैसे आकारले जाणार असल्याचे सोसायटीच्या पदाधिकाºयांना स्पष्ट केले जाते, असा आरोप मनोहर डुंबरे यांनी केला. खाजगी चाचणी, खाजगी रुग्णालय आणि आता कचरा उचलण्यासाठीही खाजगी व्यक्तींना पैसे मोजायचे, तर राज्य सरकार किंवा महापालिकेने केवळ निधी जमवायचा का, असा संतप्त सवाल त्यांनी
केला आहे.

Web Title: Home, piles of rubbish from patients in the Society's premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.