अंबरनाथमध्ये होम प्लॅटफॉर्म

By admin | Published: June 1, 2017 04:54 AM2017-06-01T04:54:45+5:302017-06-01T04:54:45+5:30

अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा वाढता ताण कमी करण्याकरिता होम प्लॅटफॉर्मचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने तयार केला आहे. त्यामुळे

Home platform in Ambernath | अंबरनाथमध्ये होम प्लॅटफॉर्म

अंबरनाथमध्ये होम प्लॅटफॉर्म

Next

अंलोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ: अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा वाढता ताण कमी करण्याकरिता होम प्लॅटफॉर्मचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने तयार केला आहे. त्यामुळे अंबरनाथमधील रेल्वे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा लाभणार आहे.
रेल्वेचे अधिकारी आणि शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी होम प्लॅटफॉर्मच्या जागेची पाहणी केली.
होम प्लॅटफॉर्म तयार झाल्यास प्रवासी पश्चिमेला उतरून थेट बाहेर जाऊ शकतील. परिणामी, गर्दीच्या वेळी पुलावरील भार कमी होईल. पश्चिमेला जागा उपलब्ध असून नगर परिषदेने सहकार्य केल्यास होम प्लॅटफॉर्म सहज होऊ शकतो, असे रेल्वेचे विभागीय अभियंते यादव यांनी निदर्शनास आणले. त्यावर, नगर परिषद सर्वतोपरी सहकार्य करील, अशी ग्वाही खा. शिंदे यांनी दिली. होम प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृहासारख्या आवश्यक त्या सुविधांची तरतूद करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. स्थानकाच्या पूर्व दिशेला शिवाजी चौकाजवळ पावसाळ्यात पाणी तुंबते. त्यावर उपाय म्हणून प्लॅटफॉर्म क्र . ३ ला समांतर वाहणारा नाला रुं द करून घेण्याचे आणि त्या नाल्याची सफाई करण्याचे निर्देश खा. शिंदे यांनी शहर अभियंता मनीष भामरे यांना दिले.
अंबरनाथ स्थानकात दोन सरकते जिने बसवण्याचे काम सुरू होणार आहे. त्याचाही आढावा खा. शिंदे यांनी घेतला. मुंबई बाजूकडील एफओबीवर एटीव्हीएम मशीन तातडीने बसवण्यात यावी, प्लॅटफॉर्म क्र . १ व २ वर स्वच्छतागृह उभे करावे, तसेच बुकिंग आॅफिसमधील रेल्वे कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी आणि बसायला खुर्च्या उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही खा. शिंदे यांनी केल्या.
पश्चिमेकडील स्कायवॉक एफओबीला जोडण्याकरिता नगर परिषदेने पुढाकार घेऊन रेल्वेला आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कर्जत दिशेकडील एफओबीच्या रु ंदीकरणाचा तसेच स्थानकात मध्यभागी नवीन एफओबीचा प्रस्ताव तयार करण्यासही त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले. या वेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, प्रज्ञा बनसोडे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, मध्य रेल्वेचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक विमल रॉय, आरपीएफ निरीक्षक एस.पी. सिंग आणि सुभाष ठाकूर उपस्थित होते.

Web Title: Home platform in Ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.