प्रामाणिकपणा हेच माझे भांडवल
By admin | Published: January 21, 2016 02:24 AM2016-01-21T02:24:48+5:302016-01-21T02:24:48+5:30
मी गाण्याशी प्रामाणिक राहिले. जे गायले ते प्रामाणकिपणे गायले. तेच माझे भांडवल आहे. सारेगम मध्ये वेगवेगळ्या धाटणीची गाणी दिली जातात.
ठाणे : मी गाण्याशी प्रामाणिक राहिले. जे गायले ते प्रामाणकिपणे गायले. तेच माझे भांडवल आहे. सारेगम मध्ये वेगवेगळ्या धाटणीची गाणी दिली जातात. जे गाणे येत नाही ते गावे लागते. यात खरी परीक्षा असते. आपला प्रयत्न प्र्रामाणिकअसेल तर यश नक्की मिळते, असे पिंगा ग पिंगा गाणे फेम गायिका वैशाली माडे हिने ठाण्यात सांगितले.
भारतीय जनता पार्टी आणि कोकण ग्रामविकास मंडळ यांच्यातर्फे शिवाईनगर येथे आयोजित केलेल्या मालवणी महोत्सवात वैशालीची मुलाखत घेण्यात आली. छोट्या गावातून माझा गायकीचा खडतर प्रवास सुरू झाला असे सांगून ती म्हणाली की रसिकांनी दिलेल्या साथीमुळेच मी सारेगम जिंकू शकले. त्यांनी दिलेल्या पाठिंब्याची परतफेड करता यावी म्हणून चांगल्या कार्यक्रमांत सहभागी होऊन त्यांच्याशी संवाद साधत असते. सारेगमच्या पहिल्या पर्वात अपयशी झाले असले तरी दुसऱ्या पर्वात यशस्वी झाले. यावेळी आम्हाला आयत्यावेळी गाणे दिले जायचे आणि त्याची तयारी करायला केवळ अर्धा तासच मिळत असे. पहिल्या पर्वात मिळालेल्या अनुभवामुळेच या आव्हानाला सामोरे जाता आले. सारेगमच्या पर्वात गझल प्रकारात सुन्यासुन्या मैफलीत माझ्या ही गझल गायल्यानंतर चित्रपट निर्माते संजय भन्साळी यांनी मला फोन करुन बोलवून घेतले. तिथे त्यांनी ती गजल पुन्हा ऐकली आणि त्यानंतर मला पिंगाची संधी मिळाली.