स्वर संकल्प या संगीतमय कार्यक्रमात महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 12:01 AM2020-03-11T00:01:36+5:302020-03-11T00:02:29+5:30
कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वर्तमानपत्र वितरक क्षेत्रातील दहा कर्तृत्ववान महिलांना सन्मानित केले.
ठाणे : प्रत्येक यशस्वी पुरु षामागे एक महिला असते. अशाच समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार महिलादिनाचे औचित्य साधून करण्यात आला. अखिल भारतीय कला, क्रीडा व सांस्कृतिक अकादमीच्या संस्थापिका साक्षी परब यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी महिला कलादर्शन २०२० या कार्यक्र माचे नियोजन संकल्प इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. ज्योती परब मॅडम व त्यांच्या सहायक शिक्षकांनी केले. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.
हौशी शिक्षकमंच आविष्कार आयोजित स्वर संकल्प हा कार्यक्र म रविवारी दुपारी १२ वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला. कार्यक्र माची सुरुवात संस्थापिका साक्षी यांच्या गणेश वंदनेने झाली व त्याला कत्थकविशारद ज्योती सावंत यांनी भावमय नृत्याची साथ दिली. या कार्यक्र माचे औचित्य साधून संकल्प इंग्लिश स्कूलचे संस्थापक डॉ. शंकर (राज) परब व संचालिका तथा मुख्याध्यापिका डॉ. ज्योती परब यांनी ठाण्यातील काही कर्तृत्ववान महिलांना मानपत्र तसेच मानचिन्ह देऊन सन्मानित केले. या समारंभाला महापौर नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, रूपाली रत्ने, ऋता आव्हाड, खगोल अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक दा. कृ. सोमण, संस्कृततज्ज्ञ ज्येष्ठ साहित्यिका मेघना सोमण आदी मान्यवर उपस्थित होते.
कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वर्तमानपत्र वितरक क्षेत्रातील दहा कर्तृत्ववान महिलांना सन्मानित केले. यामध्ये विजयलक्ष्मी गुप्ता, अनुजा घाडगे, प्रिया दरेकर, अंजुषा पाटील, पूजा कुलकर्णी, मनीषा कदम, प्रेरणा तावडे, करिष्मा खर्डीकर, वृषाली शिंदे, दीपाली साठे, समिधा पवार यांचा समावेश होता. विविध स्पर्धांतील विजेत्या महिलांनाही सन्मानित केले. याशिवाय नृत्यविशारद ज्योती सावंत, राकेश चोरगे व इतर चार महिला नृत्यांगनांचाही गौरव करण्यात आला.
पाककला स्पर्धा : प्रथम- मंजुषा पांडे, द्वितीय -रंजना पांडव, तृतीय-धनश्री तावडे, उत्तेजनार्थ- श्रद्धा चव्हाण आणि पूनम देसाई
केशभूषा स्पर्धा : प्रथम- वनिता म्हात्रे, द्वितीय- रजनी जयस्वाल, तृतीय- संगीता चौहान. उत्तेजनार्थ- लतिका भोईर, संध्या डोंगरे
कराओके गायन स्पर्धा :
प्रथम- मानसी शेलार, द्वितीय- चैताली सांगवीकर, तृतीय- संजना जीजे, उत्तेजनार्थ- अंजली बोरुले, सुखद ठाकूर, मीनल धुळे