भिवंडी महापौरपदासाठी घोडेबाजार, सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी, निवडणूक ५ डिसेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 01:56 AM2019-11-26T01:56:29+5:302019-11-26T01:57:08+5:30

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेस, शिवसेना नगरसेवकांनी बैठका घेऊन जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Horse treading for Bhiwandi mayor Election, all parties are in front, elections on December 5 | भिवंडी महापौरपदासाठी घोडेबाजार, सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी, निवडणूक ५ डिसेंबरला

भिवंडी महापौरपदासाठी घोडेबाजार, सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी, निवडणूक ५ डिसेंबरला

Next

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेस, शिवसेना नगरसेवकांनी बैठका घेऊन जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीत मोठा घोडेबाजार सुरू झाला असून, सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांमध्ये फूट पडण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीमुळे नगरसेवकांमध्ये आपापसात तंटे होत असून, फोडाफोडीच्या राजकारणात एका नगरसेवकाच्या मताला २० ते २५ लाख रुपयांचा भाव दिला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भिवंडी महापालिकेत शिवसेना, काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. महापालिकेत ९० नगरसेवक असून त्यामध्ये काँग्रेस ४७, शिवसेना १२, भाजप १९, कोणार्कविकास आघाडी ४, समाजवादी पक्ष २, आरपीआय (एकतावादी) ४, अपक्ष २ असे पक्षीय बलाबल आहे. महापौर जावेद दळवी यांच्या पदाची मुदत ९ डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे शासन निर्देशानुसार महापौरपदासाठी ५ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होणार आहे. ३० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रि या सुरु होणार असल्याची माहिती नगरसचिव अनिल प्रधान यांनी दिली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार निवडणूक कार्यक्र मात बदल होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

या नगरसेविकांची नावे आहेत चर्चेत
महापौरपद महिलांसाठी आरक्षित झाल्याने काँग्रेसतर्फे वैशाली मनोज म्हात्रे, रिषीका प्रदीप राका, मिसबा खान तर शिवसेनेच्या वतीने गुलाबताई नाईक, वंदना काटेकर, अलका चौधरी, कोणार्क विकास आघाडीतर्फे माजी महापौर प्रतिभा पाटील, भाजपतर्फे अस्मिता चौधरी यांच्या नावाची चर्चा आहे. प्रत्यक्षात महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

शिवसेनेनेही केला दावा
महापालिकेत शिवसेना-काँग्रेस आघाडीची गेल्या अडीच वर्षांपासून सत्ता असून, महापौरपद काँग्रेसकडे तर उपमहापौरपद शिवसेनेकडे आहे. सत्ता स्थापन करताना झालेल्या बोलणीप्रमाणे आता महापौरपद शिवसेनेला मिळावे, यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आग्रह धरला आहे. त्यामुळे काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांमध्ये तंटा निर्माण झाला असून, भिवंडी पालिकेत सेनेचा महापौर बसावा यासाठी नगरसेवकांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना साकडे घातले आहे.

भाजपच्याही हालचाली
भाजपचा महापौर बसविण्यासाठी खासदार कपिल पाटील यांनीदेखील हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, भाजपच्या नगरसेवकांमध्ये रु सवेफुगवे निर्माण झाल्यामुळे सध्या भाजपमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत.

काँग्रेसमध्ये तीन गट : महापौरपदासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. या पक्षात माजी आमदार रशीद ताहीर मोमीन, महापौर जावेद दळवी व ज्येष्ठ नगरसेवक इमरान वली मोहमद खान यांचे तीन गट निर्माण झाले आहेत.

Web Title: Horse treading for Bhiwandi mayor Election, all parties are in front, elections on December 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.