विक्रमगडमधील पोल्ट्रीत बिबट्याने पाडला कोंबड्यांचा फडशा

By admin | Published: February 5, 2016 02:36 AM2016-02-05T02:36:44+5:302016-02-05T02:36:44+5:30

विक्रमगड तालुक्यातील कुंर्झे गावात आज पहाटे बिबटयाने येथील प्रकाश केणी यांच्या वाडीत असलेल्या पोल्ट्रीमधील गावठी कोंबडयांवर ताव मारून ५२ कोंबडया ठार केल्या

Horses of poultry pistol thrown by a poultry leopard in Vikramgad | विक्रमगडमधील पोल्ट्रीत बिबट्याने पाडला कोंबड्यांचा फडशा

विक्रमगडमधील पोल्ट्रीत बिबट्याने पाडला कोंबड्यांचा फडशा

Next

राहुल वाडेकर,  तलवाडा
विक्रमगड तालुक्यातील कुंर्झे गावात आज पहाटे बिबटयाने येथील प्रकाश केणी यांच्या वाडीत असलेल्या पोल्ट्रीमधील गावठी कोंबडयांवर ताव मारून ५२ कोंबडया ठार केल्या. त्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यानच्या काळात वन विभागास पाचारण करण्यात आले होते, मात्र बिबटया पसार झाल्याने त्यास पकडण्यात वनविभागास अपयश आले आहे़ १कुंर्झे गावामध्ये आसपास जंगल असल्याने त्यातून गावामध्ये बिबटया येण्याची ही पहिलीच घटना आहे़ प्रथम त्यास चौधरी यांनी पाहीले त्यांनी गावातील लोकांना याबाबत सांगितले. बिबटया हा वाडीमध्ये कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी आला असावा, अंंदाज आहे़ मात्र त्याने अनेक कोंबडया का मारुन टाकल्यात? हा प्रश्न आहे. २या कोंबडया गावरान असल्याने त्याचा दर बाजारात ३५०/-रुपये आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या दरम्यान बिबटया वाडीमध्ये फिरत असतांना वनविभागास पाचारण करण्यात आले होते़ परंतु ते येईपर्यंत तो पळून गेल्याने, तो नक्की कोणत्या भागात आहे व तो कोणत्या भागातुन आला असावा याचा नक्की अंदाज बांधता आला नाही़ यापूर्वी असा प्रकार कधी घडल्याचे एैकीवात नाही़ ३दरम्यानच्या काळात बिबटयाच्या या आगमानाने गावातील लोक मात्र भयभीत झाले असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिबट्या हा शेड्युल ए चा प्राणी असल्याने त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यासाठीही वन्यजीव संरक्षकांची परवानगी आवश्यक असते. ती मिळाल्यानंतरच त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे वनखात्याच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: Horses of poultry pistol thrown by a poultry leopard in Vikramgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.