आरोग्य आयुक्तांकडून रुग्णालयांची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 12:53 AM2019-01-23T00:53:01+5:302019-01-23T00:53:06+5:30

प्रादेशीक मनोरुग्णालय व सिव्हील रुग्णालयास विविध समस्यांनी ग्रासले आहे.

Hospital Shrubs from Health Commissioner | आरोग्य आयुक्तांकडून रुग्णालयांची झाडाझडती

आरोग्य आयुक्तांकडून रुग्णालयांची झाडाझडती

Next

ठाणे : येथील प्रादेशीक मनोरुग्णालय व सिव्हील रुग्णालयास विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्याची दखल घेऊन आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव यांनी सोमवारी या रुग्णालयांची पाहाणी करून प्रशासनास धारेवर धरले. याशिवाय कामकाजाची झाडाझडती घेतली. लवकरच सुरू होणाऱ्या सिव्हीलच्या बांधकामासाठी हे भाग टप्याटप्याने अन्यत्र स्थलांतरीत करण्याचे मार्गदर्शनही त्यांनी यावेळी प्रशासनास केले.
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय व मनोरुग्णालयाच्या पाहाणी दौºयाप्रसंगी यादव सोमवारी ठाण्यात आले होते. त्याप्रसंगी आरोग्य विभागाच्या कोकण व नाशिक विभागाच्या कामाचा आढावादेखील डॉ. अनुपकुमार यादव यांनी घेतला. जिल्हा शासकीय रुग्णालय इमारतींची व जिल्हा मनोरुग्णालयाचीदेखील पाहाणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्यासोबत बैठक घेतली. याबैठकीत रुग्णालयाच्या इमारतीच्या स्थलांतरणासाठी जागा निश्चित करण्याबाबत तसेच रु ग्णालय नव्याने कसे उभारणी करण्यात येणार आहे,याबाबतही बैठकीत चर्चा केली.
दरम्यान, दुरु स्तीच्या काळात रु ग्ण स्थलांतर करावे लागणार असून त्यासाठी योग्य जागा निवडण्याचे काम सुरू असल्याची माहिती आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव यांनी दिली. तसेच बांधकामासाठी वास्तुविशारद नेमण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच या पाहाणी दौºयाचा अहवालदेखील शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या पाहणी दौºयाच्यावेळी डॉ. यादव यांनी जिल्हा रूग्णालयातील वेगवेगळ्या वॉर्डात जाऊन रु ग्णांची विचारपूस करून रूग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतला.
सिव्हीलमध्ये उपचार घेण्यासाठी शेकडो रूग्ण येत असतात. या रूग्णालयाच्या मुख्य इमारतीसह अन्य दोन इमारतींची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. यापूर्वी मुख्य इमारतीतील प्रसुती विभागातील छताचे प्लास्टरही कोसळल्याची घटना घडली होती. त्यामुळे एकूणच रूग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर सुमारे वर्षभरापूर्वी राज्य सरकारने या जागेची इमारती पाडून त्या जागी नवीन सुपर स्पेशालिटी रु ग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी रूग्णालयातील रूग्णांना दुसºया जागी हलविण्यात येणार आहे.
>आरोग्य विभागाकडून जागेचा शोध सुरू आहे. कामगार रुग्णालय, मुंब्रा, कशीश पार्क आणिरु स्तमजी गृहसंकुल परिसरात यासाठी जागा शोधण्यात आल्या आहेत. मात्र, त्यापैकी एकाही जागा अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.

Web Title: Hospital Shrubs from Health Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.