शिपायाअभावी रुग्णालये रात्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 03:53 AM2018-09-20T03:53:54+5:302018-09-20T03:54:23+5:30

सातपाटी, मुरबे, सफाळे येथील आरोग्य केंद्राला रात्री टाळे; घ्यावी लागते गुजरातमध्ये धाव

Hospitals shut in the night due to absence of soldiers | शिपायाअभावी रुग्णालये रात्री बंद

शिपायाअभावी रुग्णालये रात्री बंद

googlenewsNext

- हितेन नाईक

पालघर : रुग्णालयात डॉक्टर नसल्याने ते बंद पडल्याचे माहित होते, परंतु शिपाई नसल्यामुळे रुग्णालयच बंद ठेवण्याची पाळी आरोग्य विभागावर ओढवल्याचा अजब प्रकार सातपाटीत घडला असून त्याचा मोठा फटका गरीब रुग्णांना बसत आहे. त्यांच्या नातेवाईकांना आपल्या आजारी आप्तांचा जीव वाचविण्यासाठी खाजगी अथवा सरळ गुजरात राज्यातील रुग्णालयात धाव घ्यावी लागते आहे.
सातपाटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा शिपाई सेवानिवृत्त झाल्यामुळे त्या रुग्णालयाची रात्रीची सेवाच बंद करण्याच्या प्रकाराने जिल्ह्यातील प्रशासन आरोग्य सेवे सारख्या महत्वपूर्ण विषयावर कोणत्या मानसिकतेतून काम करतंय असा प्रश्न निर्माण होत आहे.
तालुक्यातील मुरबे, सफाळे, सातपाटी आदी चार प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपाई सेवानिवृत्त झाले असून ही पदे जिल्हापरिषदेतील सामान्य प्रशासन विभागा कडून भरली जात नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचा डोलारा डगमगू लागला आहे. सातपाटी सह अन्य काही प्राथमिक आरोग्य केंद्राने १ सप्टेंबर पासून लावलेल्या फलकावर रात्रीला पुरुष शिपाई नसल्याने रात्री रु ग्णालय बंद राहणार असल्याचे लिहिले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात खाजगी डॉक्टरांची वानवा असल्याने रात्री उपचारा अंती आजारी रुग्ण, गर्भवती महिलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
पालघर नवनगर निर्मितीचे काम जोमात सुरू असले तरी आरोग्य, पाणी, वीज ह्या महत्वपूर्ण बाबी पुरेशा नसल्याने पूर्वीचे दिवस बरे होते असे पालघरवासीय आता बोलू लागले आहेत. मागील दोन वर्षांपासून अद्ययावत असे ट्रॉमा केअर सेंटर, जिल्हा रुग्णालय उभारणीच्या घोषणा सत्ताधाऱ्याकडून दिल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र ह्या दोन्ही वास्तूंची साधी एक वीट ही रचण्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला यश आलेले नाही. जिल्ह्यात ९ ग्रामीण रुग्णालय, ३ उपजिल्हा रु ग्णालय, ४६ प्राथमिक आरोग्य केंदे्र, ३०६ उप केंद्रे आदी कागदोपत्री भक्कम आरोग्याची व्यवस्था सर्वसामान्य, दुर्गम आदिवासी रु ग्णांवरील उपचारासाठी उभारण्यात आली असल्याचे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र आजही जिल्ह्यातील गरीब रुग्णांना उपचारासाठी गुजरात राज्यातील वापी येथील विनोबा भावे रु ग्णालय आणि केंद्रशासित प्रदेशातील सिल्व्हासा येथील रु ग्णालयामध्ये जाण्याची गरज भासत आहे? आरोग्य सेवेतील नेमक्या उणिवा शोधून त्यावर तात्काळ उपाय योजना आखणे गरजेचे असताना नेमके त्याकडे दुर्लक्ष का? केले जात आहे. हे न कळण्या पलीकडचे असल्याचे मत माजी नगरसेवक अरु ण माने ह्यांनी व्यक्त केले आहे.
दिवसेंदिवस गुजरात राज्याकडे रुग्णांचा वाढत जाणारा लोंढा इथल्या आरोग्य सेवेचे नाकर्तेपण अधोरेखित करीत असून लोकप्रतिनिधींनी कडून ह्या विभागाला पुरेसे पाठबळ मिळत नसल्याने इथली आरोग्य सेवेलाच सलाईनवर ठेवावे लागण्याची वेळ आली आहे. जिल्हा निर्मिती नंतर आपल्याला आरोग्य, पाणी, शिक्षण आदींसह अनेक परिवहनाच्या सोयीसुविधा मिळतील या सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा पार चुराडा झाला असून जिल्हा निर्मिती नंतरच्या चार वर्षात सर्वसामान्यांना दिलासा देणारी एकही गोष्ट अमलात न आल्याची टीका होत आहे.

तुटपुंज्या सुविधाही यापुढे रात्रीला बंद?
सध्या काही रु ग्णांच्या नातेवाईका कडून डॉक्टरवरील हल्ला प्रकरणात वाढ होत आहे. तसेच काही राजकीय पक्ष ,संघटनांचे पदाधिकारी, मद्यपान केलेल्या व्यक्ती कडून पालघर ग्रामीण रुग्णालयासह अनेक
रु ग्णालयात धुडगूस घातला जात असल्याने रात्रीच्या वेळी महिला डॉक्टर, नर्स या रुग्णालयात राहणे पसंत करीत नाहीत.

पालघर ग्रामीण रुग्णालयात अशा घटना अनेक वेळा घडत असल्याने गरीब रु ग्णांना मिळणाºया तुटपुंज्या सुविधाही बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कमी स्टाफ, अत्यल्प सोयीसुविधा असतांनाही ह्या रुग्णालयात तालुक्यातून येणाºया रुग्णांना चांगले उपचार देण्याचा प्रामाणकि प्रयत्न केला जात आहे.

अश्या प्रकारचा बोर्ड लावणे चुकीचे असल्याचे ते हटविण्याचे आदेश मी दिले असून आरोग्य केंद्रात असलेल्या फंडातून पर्यायी मार्ग काढण्याच्या सूचना मी दिल्या आहेत.
- दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी.

Web Title: Hospitals shut in the night due to absence of soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.