ग्रामीण भागातील वसतिगृह, आश्रमशाळा सोमवारपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:39 AM2021-03-20T04:39:54+5:302021-03-20T04:39:54+5:30

ठाणे : जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागांसह शहापूर व मुरबाड नगरपंचायत क्षेत्रांतील इयत्ता पाचवी ते बारावीच्या वर्गांसाठी केवळ आदिवासी विकास ...

Hostels in rural areas, Ashram schools closed from Monday | ग्रामीण भागातील वसतिगृह, आश्रमशाळा सोमवारपासून बंद

ग्रामीण भागातील वसतिगृह, आश्रमशाळा सोमवारपासून बंद

googlenewsNext

ठाणे : जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागांसह शहापूर व मुरबाड नगरपंचायत क्षेत्रांतील इयत्ता पाचवी ते बारावीच्या वर्गांसाठी केवळ आदिवासी विकास विभागाची सर्व वसतिगृहे व निवासी आश्रमशाळा, समाजकल्याण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व वसतिगृहे व निवासी शाळा २२ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी रात्री दिले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या दोन दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येवरील उपाययोजनेंतर्गत त्यांच्या अखत्यारीतील आश्रमशाळा, वसतिगृह पुढील आदेश येईपर्यंत सोमवारपासून बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशासह जिल्हाधिकाऱ्यांनी इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहणे ऐच्छिक केले आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाइन शिक्षण पूर्ववत सुरू ठेवण्याचे त्यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगरपालिका कार्यक्षेत्र वगळून जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी तत्काळ आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचनाही त्यांनी संबंधित प्रशासनाला दिली आहे. याबाबतचे सर्व समन्वयन व संनियंत्रणासाठी आदिवासी विकास विभागासह समाजकल्याण, नगरपंचायत व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला जबाबदार धरण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे नार्वेकर यांनी सांगितले.

Web Title: Hostels in rural areas, Ashram schools closed from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.