वडिलांच्याच चेहऱ्यावर फेकली गरम कॉफी, जमिनीच्या किमतीचा वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 05:17 AM2018-12-19T05:17:03+5:302018-12-19T05:17:36+5:30
जमिनीच्या किमतीचा वाद : लीज रद्द करण्याची मागणी
ठाणे : जमिनीची किंमत कमी असल्याने लीज व्यवहार रद्द करण्यासाठी तगादा लावणाºया वडिलांच्या तोंडावर मुलानेच गरम कॉफी फेकल्याची घटना ठाण्यात समोर आली आहे. हा प्रकार २९ सप्टेंबर २०१८ घडला असून याप्रकरणी ७ आॅक्टोबर रोजी केलेल्या तक्रार अर्जानंतर अखेर हा गुन्हा सोमवारी १७ डिसेंबर रोजी दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नितीन कंपनी येथे राहणारे रवींद्र पालेकर (५७) असे जखमी तक्रारदारांचे नाव आहे. त्यांनी मौजे मोघरपाडा येथील जमीन २००३ मध्ये सासºयांच्या नावाने खरेदी केली होती. ती सासºयांच्या मृत्यूपत्रांद्वारे मुलगा आशय याचे नावावर सातबाराप्रमाणे नोंदवली गेली होती. ती जमीन आशय याने दुय्यम निबंधक कार्यालयात जावून मुंबईतील एका कंपनीला लीजवर दिली. त्याबदल्यात आशय याला फक्त ३० लाख रुपये डिपॉझिट मिळाले आहे. मात्र, त्या जागेचे बाजारमूल्य भाव ११ कोटी असल्याने तो लीजचा व्यवहार रद्द करावा असे ते सांगत होते.
याचदरम्यान, २९ सप्टेंबर रोजी त्यांची पत्नी, मुलगा आणि सुन या तिघांनी त्यांच्या राहत्या घरात हा व्यवहार रद्द करणार नाही, तुम्ही अडथळा आणू नका अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यानंतर मुलाने हातातील गरम कॉफी तोंडावर फेकल्याने ते भाजून जखमी झाल्याचे म्हटले.
याप्रकरणी उपचारानंतर त्यांनी ७ आॅक्टोबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रारी अर्जाद्वारे तक्रार केली. त्यावेळी त्यांनी उपचाराचे सटिर्फिकेटही सादर करताना, पत्नी,मुलगा आणि सुनेविरोधात तक्रार दिल्याचे म्हटले आहे. त्या अर्जानुसार १७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सी.जे. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.