ठाणेच्या पोखरण रोडवरील हाँटेलला मध्यरात्री आग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 11:36 AM2020-07-19T11:36:33+5:302020-07-19T11:39:03+5:30
मध्यरात्री पोखरण रोडवरील एका हॉटेलमध्ये आग लागण्या ची घटना घडली. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीच्या घटना स्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
ठाणे - मध्यरात्री पोखरण रोडवरील एका हॉटेलमध्ये आग लागण्या ची घटना घडली. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीच्या घटना स्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
पोखरण रोडवरील आगीच्यख घटनेसह वागळे ईस्टेटजवळील इंदिरा नगरमधील एका दुकाला आग लागल्याच्या घटनेसह ठाणे परिसरात रात्रभरात आगीच्या किरकोळ चार घटना घडल्या आहेत. याशिवाय कोपरीच्या आनंदनगर जवळ एक झाड पडले तर ठिकठिकाणी शहर परिसरात झाडाच्या फांद्या तुटल्या च्या चार घटना घडल्या आहेत. कळवा ब्रीज, खारटन रोड परिसरात रात्री केमिकल्स चा वास येत असल्याची तक्रार येताच ठाणे महापालिके च्या पथकाने या परिसरात जाऊन पाहणी केली. आज दुपारी 12 वाजेपासून भरती असल्यामुळे खाडी किनारी साडेचार मीटरपर्यंत लाटा उसळणार असल्या चे ठाणे मनपा आपत्ती नियंत्रण कक्षाने सांगितले.
जिल्ह्यात अवघा 78 मिमी पाऊस
जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये अवघा 78.04 मिमी. म्हणजे सरासरी 11.13 मिमी पाऊस गेल्या 24 तासात पडल्याची नोंद करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक ठाणे शहर परिसरात 18 मिमी पाऊस पडला. या खालोखाल कल्याण 20 मिमी., मुरबाडला 7 मिमी तर उल्हासनगर अल्पसा पाऊस, अंबरनाथ पाच मिमी, भिवंडी 18, शहापूरला 13 मिमी पाऊस पडला आहे. मुंबई, ठाणेला पाणी पुरवठा करणा र्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ही पावसाने हुलकावणी दिली आहे.
धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी असल्याचे आढळून आले. ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगर परिषद, गांवपाडे आणि एमआयडीसीला पाणि पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात आजपर्यंत 45.56 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी या दिवशी 41.97 टक्के पाणी साठा या धरणात होता. या धरणात आज अवघा 12 मिमी पाऊस पडला. तर या धरणाच्या पाणलोट क्षेत्रापैकी खानिवरे परिसरात 20 मिमी, कान्होळला 16,पाटगांवला 6 आणि ठाकुरवाडीला 25 मिमी पाऊस या बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडला.