ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 06:39 PM2021-04-08T18:39:08+5:302021-04-08T18:39:30+5:30

ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Hoteliers in Thane meet CM Uddhav thackreay | ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनामुळे ठाणे जिल्ह्याला घातलेल्या विळख्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे हॉटेल्स, बार अँड रेस्टोरंट यांच्यावरही उपासमारीची वेळ आली  आहे. कोरोनाच्या काळात हॉटेल मालकांना चांगलाच फटका बसला आहे. त्यात नवीन नियमावली आणि कडक निर्बंधामुळे हॉटेल मालकांनी मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढावा अशी कळकळीची विनंती हॉटेल मालकांनी केली आहे. तसेच  राज्य उत्पादन शुल्क विभागाची वार्षिक फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आणि त्याशिवाय बार अँड रेस्टोरंट चालविणो शक्य नसल्याने ठाण्यातील सर्वच बार अँड रेस्टोरंटमध्ये काही दिवसापूर्वी मद्यविक्र ी बंद करण्यात आलेली होती.  सरकारला महसूल हवा असल्यास त्यांनी सवलत द्यावी असा सूर ठाणे  हॉटेल असोशिएशनच्या वतीने लावला आहे. तसेच गुरवारी ठाण्यात मुक आंदोलनही करण्यात आले.


  देशात आणि खासकरून महाराष्ट्रत कोरोनाने अगदी थैमान घातले असून देशातील एकूण बाधिता पैकी जवळपास ३० टक्के रु ग्ण हे हे केवळ महाराष्ट्रातून येत आहेत. वाढती रु ग्णसंख्या पाहता सरकारने अनेक पाऊले उचलली आहेत. त्याची कु:हाड हॉटेल व्यावासायावर कोसळली आहे. रात्री आठ वाजेपर्यंत पार्सल सव्र्हीसाठी उघडी असलेली हॉटेल्स सरसकट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या ठाण्यातील या व्यवसायातील सर्वांनीच एकत्र येत गुरवारी मूक आंदोलन केले. लाखोंची कर्जे आणि मिळकत शून्य झाल्याने या व्यवसायाशी निगडीत अनेकांनी एकत्र येत सरकारला निर्बंध शिथिल करण्याची विनंती केली. लवकरच हॉटेल उघडली नाहीत तर बायकामुलांना घेऊन आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

गावरून नौकरीसाठीच आलो, कुटुंबाच्या उदरिनर्वाहाची चिंता आहे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च डोक्यावर आहे. तर दुसरीकडे राज्यसरकारच्या नव्यानव्या नियमांमुळे हॉटेल, बार  बंद पडले, आता आमच्यावर उपासमारीची वेळ आली. उपासमारीच्या उंबरठ्यावर आलेल्या हॉटेल आणि बार मालकासह बारमधील हातावरचे पोट असलेले कर्मचारी यांनाही गुरवारी मुक आंदोलन करून सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. मिशन बिगेन अगेन नंतर ब्रेक द चैन, माझे  कुटूंब माझी जबाबदारी अशी ब्रीदवाक्य सांगतात.  परंतु माझे   कुटुंब  माझी  जबाबदारी, मग सरकारची काही नैतिकता आहे की नाही असा सवाल आता कर्मचारी वर्गाने उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करावे, तीन प्रकारचे टॅक्स भरत आहोत, त्यानंतर आता पुन्हा मोठा भार डोक्यावर आला आहे. कामगारांना पगार, राहणो करीत आहोत. आम्ही देखील व्यावसायिक आहोत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर विचार करुन लवकरच तोडगा काढावा.
(चंद्रशेखर शेटटी - ठाणे  हॉटेल असोसिएशन, उपाध्यक्ष)

Web Title: Hoteliers in Thane meet CM Uddhav thackreay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.