उल्हासनगरात हॉटेल, बार, उपहारगृह राहणार रात्री १० वाजेपर्यंत उघडे, आयुक्तांचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 07:33 PM2020-10-06T19:33:34+5:302020-10-06T19:35:09+5:30
Ulhasnaar News : उल्हासनगरातील बार, हॉटेल, उपहारगृह व फूड कोर्ट ५० टक्के क्षमतेने सकाळी ९ ते रात्री १० वाजे पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी काढला आहे.
उल्हासनगर - महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी ५ आॅक्टोबर पासून ५० टक्के क्षमतेने बार, हॉटेल, फूड दुकाने व उपहारगृह सुरू ठेवण्याला मान्यता दिली. तसे आदेश आयुक्तांनी काढले असून दुकानें रात्री १० वाजे पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी होतात.
उल्हासनगरातील बार, हॉटेल, उपहारगृह व फूड कोर्ट ५० टक्के क्षमतेने सकाळी ९ ते रात्री १० वाजे पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी काढला आहे. आयुक्तांच्या आदेशाचे सर्वत्र स्वागत होते आहे. हॉटेल, बार, उपहारगृह आदी प्रमाणे दुकानें रात्री १० वाजे पर्यंत सुरू ठेवण्याला मान्यता द्यावी. अशी मागणी व्यापारी संघटनेचे दिपक छतवानी यांनी केली. तशी मान्यता मिळाल्यास व्यापारी हब असलेल्या शहरात व्यापाऱ्याला चालना मिळून हजारो नागरिकांच्या हाताला काम मिळणार असल्याचे छतवानी म्हणाले. तसेच लोकल रेल्वे सुरू झाल्यास शहराला पूर्वीचे वैभव मिळणार असल्याचे ते म्हणाले. महापालिका आयुक्तांच्या आदेशाचे बार, हॉटेल व उपहारगृहाचे नियम पाळावे, अशी प्रतिक्रिया सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी