एका तासाच्या पावसाने उडवली नागरिकांची दैना, तळ मजल्यात शिरले पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 06:36 PM2021-06-05T18:36:34+5:302021-06-05T18:37:00+5:30

शहरातील नाले-सफाईचा प्रश्न गंभीर

An hour of rain washed away the misery of the citizens, water seeped into the ground floor | एका तासाच्या पावसाने उडवली नागरिकांची दैना, तळ मजल्यात शिरले पाणी 

एका तासाच्या पावसाने उडवली नागरिकांची दैना, तळ मजल्यात शिरले पाणी 

Next
ठळक मुद्देपावासाच्या आगमनानंतर एका तासात पाणी कार्यालयांमध्ये शिरल्याने इलेक्ट्रिक साहित्य वाचविण्यासाठी कार्यालयातील मंडळींची मोठी धावाधाव उडाली होती.

भिवंडी - भिवंडीत शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र, तासभर पडलेल्या मुसळधार पावसाने भिवंडी मनपाच्या नाले सफाईचे पितळ उघडे पाडले. शहरातील धर्मवीर आनंद दिघे चौकाच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या खासगी कार्यालयांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठी दैना उडाली होती. या तळ मजल्यावर टायपिस्ट तसेच, सायबर कॅफे व काही वकिलांचे खासगी कार्यालये असून या कार्यालयांमध्ये पाणी शिरले होते. 

पावासाच्या आगमनानंतर एका तासात पाणी कार्यालयांमध्ये शिरल्याने इलेक्ट्रिक साहित्य वाचविण्यासाठी कार्यालयातील मंडळींची मोठी धावाधाव उडाली होती. विशेष म्हणजे पावसाळा सुरू झाला तरी शहरातील नाले सफाई अजूनही झाली नसल्याने भविष्यात मुसळधार पावसात भिवंडीत पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे. एका तासात पलेल्या पावसातुनच भिवंडी महापालिका काही बोध घेणार का की शहर बुडण्याची वाट पाहणार हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. 
 

Web Title: An hour of rain washed away the misery of the citizens, water seeped into the ground floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.