जनआशीर्वाद यात्रेच्या तासभरआधी सुरू होते खड्डे भरण्याचे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 01:21 AM2019-09-19T01:21:54+5:302019-09-19T01:22:01+5:30

शिवसेनेला धारेवर धरले जात होते, त्या फॉरेस्ट नाका रस्त्यावरूनच आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली.

Hours of pilgrimage begins before the pilgrimage | जनआशीर्वाद यात्रेच्या तासभरआधी सुरू होते खड्डे भरण्याचे काम

जनआशीर्वाद यात्रेच्या तासभरआधी सुरू होते खड्डे भरण्याचे काम

Next

अंबरनाथ : शिवसेनेला धारेवर धरले जात होते, त्या फॉरेस्ट नाका रस्त्यावरूनच आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली. फॉरेस्ट नाक्याचा रस्ता हा एमएमआरडीएच्या चुकीमुळे थांबलेला आहे. शहरातील सर्वात वादग्रस्त असलेल्या फॉरेस्ट नाक्याच्या रस्त्यावरून यात्रा सुरू करण्यात आली. या रस्त्याची दुरवस्था लपवण्यासाठी २४ तास रस्त्यावर काम सुरूहोते. यात्रा सुरू होण्याच्या तासभर आधीपर्यंत मार्गावरील खड्डे भरले जात होते.
अंबरनाथ शहरातून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा कल्याण लोकसभा मतदारसंघात आली होती. या यात्रेला अंबरनाथमधून सुरुवात करण्यात आली. या यात्रेसाठी ठाकरे हे रात्री उशिरा अंबरनाथमध्ये एका हॉटेलमध्ये वास्तव्यास आले होते. सकाळी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यावर ११ वाजता यात्रेला सुरुवात झाली. आदित्य येणार असल्याने मंगळवारी दिवसभर या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम सुरू होते. पुन्हा रात्री खड्डे पडणार हे लक्षात आल्यावर खड्डे भरणाºया ठेकेदाराला सकाळी पुन्हा ८ वाजता रस्त्यावरील खड्डे भरण्यास सांगण्यात आले.
या मार्गावरील सर्वात खराब रस्ता फॉरेस्ट नाक्यावर असल्याने त्या ठिकाणी ठेकेदारचे कामगार खड्डे भरण्यासाठी उभेच होते. यात्रा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी हे काम संपवत हा मार्ग खुला करण्यात आला. हीच परिस्थिती अंबरनाथ उड्डाणपुलाचीही होती. त्याठिकाणीही रस्ते भरून रस्ता सुरळीत करण्यात आला होता.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्वागत कमान उभारण्यात आल्या होत्या. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Hours of pilgrimage begins before the pilgrimage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.