घराला आग लागून संसार उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:41 AM2021-03-27T04:41:38+5:302021-03-27T04:41:38+5:30
किन्हवली : कुल्हे येथील रहिवासी तातू नारायण वरकुटे यांच्या घराला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने घरातील संपूर्ण सामान ...
किन्हवली : कुल्हे येथील रहिवासी तातू नारायण वरकुटे यांच्या घराला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले.
घरातील सगळे जण झोपेत असताना अचानक घराला आग लागली. वरकुटे यांनी प्रसंगावधान राखत दोन लहान मुलांसह इतरांना बाहेर काढले. आग इतकी भयंकर होती की घरात ठेवलेले पैसे व मौल्यवान वस्तूही घेता आल्या नाहीत. बघताबघता घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले. यामध्ये घरातील कपडे, भांडी, तांदळसह घरात ठेवलेला भाताच्या गोण्या व साठ हजारांची अक्षरश: राख झाली. घरात असलेल्या सिलिंडरचाही स्फोट झाला. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण कळू शकलेले नाही.
दरम्यान, सकाळी उशिरापर्यंत सरकारी यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी पोहोचली नव्हती. मात्र घटनेचे गांभीर्य बघून काही व्यक्तींनी कुटुंबाला आर्थिक मदत केली.