कळव्यात गॅस गळती होऊन घराला आग ; एक जण किरकोळ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 09:19 PM2023-09-15T21:19:34+5:302023-09-15T21:20:17+5:30
या घटनेत घरामधील कपडे आणि इतर साहित्यांचे जळून नुकसान झाल्याची महिती सूत्रांनी दिली.
ठाणे: सिलिंडरमधून गॅस गळती होऊन घराला आग लागल्याची घटना कळवा पूर्व पौंडपाडा येथे शुक्रवारी सायंकाळी ६ ते ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीवर नियंत्रण मिळवताना स्थानिक शत्रुघ्न ठाकूर (४३) हे रहिवाशी जखमी झाले असून त्यांच्या पाठीला किरकोळ दुखापत झाली आहे. ही आग अर्ध्या तासात नियंत्रणात आली. या घटनेत घरामधील कपडे आणि इतर साहित्यांचे जळून नुकसान झाल्याची महिती सूत्रांनी दिली.
निताराजकुमार जयस्वाल यांच्या घरामधील एचपी कंपनीच्या गॅस सिलिंडरमधील नोझलमधून गळती होऊन घरामध्ये आग लागली हाेती. ही माहिती मिळताच घटनास्थळी कळवा पोलीसांसह टोरंट विभागाचे कर्मचारी, ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनीधाव घेतली होती. ठाकूर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचे पाेलिसांनी सांगितले.