ठाण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सफाई कामगाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 10:17 PM2019-08-30T22:17:02+5:302019-08-30T22:23:43+5:30
चॉकलेटचे अमिष दाखवित एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाºया संतोष शिंदे(४५) या सफाई कामगाराला गुरुवारी रात्री चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने मानपाडा भागात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ठाणे: मानपाडा भागातील एका आठ वर्षीय मुलीवर चॉकलेटचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणा-या संतोष काशिराम शिंदे(४५, रा. एमएमआरडीए, वसाहत, ठाणे) या सफाई कामगाराला गुरुवारी रात्री चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पिडीत मुलगी ही घोडबंदर रोडवरील दोस्ती एम्पेरिया इमारतीमधील एमएमआरडीएच्या घरांमध्ये वास्तव्याला आहे. तिची आई घरकाम करते. तर वडील सफाई कामगार आहेत. घरातील गॅस संपल्यामुळे २९ आॅगस्ट रोजी तिला शाळेत नेण्यासाठी आईने डबा बनविला नव्हता. त्यामुळे ती घरीच होती. तर आई वडील हे दोघेही कामावर गेले होते. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान त्याच इमारतीमधील सफाई कामगार शिंदे याने तिला मी सांगेल तसे केल्यास मोठे चॉकलेट देईल, असे अमिष दाखवित त्याच्या घरात नेले. तिथे तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत असल्याने तिने आरडाओरडा केला. तिने कशीबशी त्याच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली आणि तिच्या घरात गेली. त्यानंतरही पुन्हा तिच्या मागे येत त्याने तिला त्याच्या घरात बोलविण्याचा प्रयत्न केला. परंतू, तिने दरवाजा न उघडल्याने ती यातून बचावली. हा प्रकार तिने दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घरी परतलेल्या आपल्या आईला सांगितला. त्यावेळी तिच्या आईसह शेजारच्या महिलांनी चितळसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. याप्रकरणाची गंभीर दखल घेत चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या पथकाने शिंदे याला मानपाडा भागातून रात्री ११ वा. च्या सुमारास अटक केली. त्याच्याविरुद्ध ३७६ - अ, ब आणि लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षणअधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पिडीत मुलीला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती सुधारत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.