भिवंडीत घरे, दुकानांत पाणीच पाणी, व्यापारी-नागरिकांची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:27 AM2021-07-20T04:27:25+5:302021-07-20T04:27:25+5:30

भिवंडी : भिवंडी शहर व ग्रामीण भागात रविवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने सोमवारी सकाळी शहरात ठिकठिकाणी सखल भागात ...

Houses in Bhiwandi, water in shops, misery of traders and citizens | भिवंडीत घरे, दुकानांत पाणीच पाणी, व्यापारी-नागरिकांची दैना

भिवंडीत घरे, दुकानांत पाणीच पाणी, व्यापारी-नागरिकांची दैना

Next

भिवंडी : भिवंडी शहर व ग्रामीण भागात रविवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने सोमवारी सकाळी शहरात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. धामणकरनाका कल्याण रोड परिसरात दुकानात शिरल्याने व्यापारी तर नदीनाका व ईदगा रोड परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा त्रास झाला.

भिवंडी वाडा रस्त्यावर नदीनाका, अंजुरफाटा ते पूर्णा, अंजुरफाटा ते कल्याणनाका, अंजुरफाटा ते खारबाव रस्त्यावर पाणी साचल्याने सकाळी चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना दुचाकी वाहने व रिक्षा बंद पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठी वाहतूककोंडी झाली होती.

रविवारी रात्रभर कोसळलेल्या पावसाने शहरातील तीनबत्ती भाजी मार्केट , छ. शिवाजी महाराज चौक, धामणकरनाका, कल्याणनाका, म्हाडा कॉलनी, ईदगा रोड, कारीवली दर्गा रोड, कमला हॉटेल, गुलजार हॉटेल, निजामपुरा, राहनाळ, नारपोली, पद्मानगर, बसस्थानक परिसरात पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

Web Title: Houses in Bhiwandi, water in shops, misery of traders and citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.