सुविधांअभावी गृहसंकुले वाऱ्यावर; आमदार निधीचा हवा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:06 AM2021-05-05T05:06:42+5:302021-05-05T05:06:42+5:30

ठाणे : मागील दशकात राज्यात विशेषतः एमएमआरडी क्षेत्रात गृहसंकुले मोठ्या प्रमाणात उभारली गेली आहेत. ठाण्यात अनेक गृहसंकुलांमध्ये सोयीसुविधांअभावी ...

Housing complexes wind down due to lack of facilities; The wind of MLA funding | सुविधांअभावी गृहसंकुले वाऱ्यावर; आमदार निधीचा हवा हात

सुविधांअभावी गृहसंकुले वाऱ्यावर; आमदार निधीचा हवा हात

Next

ठाणे : मागील दशकात राज्यात विशेषतः एमएमआरडी क्षेत्रात गृहसंकुले मोठ्या प्रमाणात उभारली गेली आहेत. ठाण्यात अनेक गृहसंकुलांमध्ये सोयीसुविधांअभावी सर्वसामान्य रहिवासी हवालदिल झाले आहेत. यामुळे येथील अत्यावश्यक विकासकामांसाठी आमदार निधी वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठाणे शहरात गेल्या १० ते १५ वर्षांत मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. यात पाच-पाच हजारांहून जास्त लोकवस्ती आहे. या काळात येथील रस्ते-ड्रेनेज यांची दुरवस्था झाली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने या सोसायट्यांना विकासकामे करणे अशक्य आहे. परिणामी त्यांना अनेक अडीअडचणी आणि हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी आमदार निधी वापरण्याची परवानगी दिल्यास येथील हजारो नागरिकांना दिलासा मिळू शकेल, असे मत केळकर यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे. सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनीवर आमदार निधीतून विकासकामे करता येतात. गृहसंकुले खासगी जमिनीवर असल्याने तेथे आमदार निधीतून मूलभूत सोयी-सुविधा देता येत नाहीत. येथे आमदार निधी वापरल्यास हजारो सर्वसामान्य कुटुंबांना त्याचा फायदा मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Housing complexes wind down due to lack of facilities; The wind of MLA funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.