ठाण्यात हाऊसिंग फेडरेशन करणार पर्यावरणपूरक सामूहिक अग्निहोत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 09:50 PM2019-11-27T21:50:54+5:302019-11-27T22:14:54+5:30

ठाण्यात प्रथमच पर्यावरणाला पूरक अशा सामूहिक अग्निहोत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे १० हजार नागरिक सहभागी होणार असून त्यातील साडेचार हजार नागरिकांनी नोंदणी केल्याची माहिती ठाणे डिस्ट्रिक्ट को-आॅपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांनी दिली.

 Housing Federation in Thane to set up an environmentally friendly collective fire hydrant | ठाण्यात हाऊसिंग फेडरेशन करणार पर्यावरणपूरक सामूहिक अग्निहोत्र

पर्यावरण संवर्धनासाठी प्रथमच आयोजन

Next
ठळक मुद्देदहा हजार ठाणेकर होणार सहभागीपर्यावरण संवर्धनासाठी प्रथमच आयोजनसाडेचार हजार रहिवाशांनी केली नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन आणि विश्वफाऊंडेशनच्या वतीने ठाण्यात प्रथमच पर्यावरणाला पूरक अशा सामूहिक अग्निहोत्राचे आयोजन केले आहे. यामध्ये सुमारे १० हजार नागरिक सहभागी होणार असून त्यातील साडेचार हजार नागरिकांनी नोंदणी केली आहे. या अग्निहोत्रासाठी लागणाऱ्या होमकुंडासह सर्व साहित्याचेही मोफत वाटप केले जाणार असल्याची माहिती ठाणे डिस्ट्रिक्ट को-आॅपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी बुधवारी दिली.
येत्या ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास उपवन तलावाच्या बाजूला असलेल्या मैदानामध्ये हा अनोखा उपक्रम होणार आहे. याठिकाणी उपस्थित राहण्यासाठी ठाणे रेल्वेस्थानकापासून पोखरण रोड क्रमांक एक येथील कॅडबरी कंपनी आणि पोखरण रोड क्रमांक दोन येथील मारिया हॉल तसेच माजिवडा येथून ठाणे परिवहन सेवेची (टीएमटी) दुपारी ३.३० ते ५.३० या काळात बसची व्यवस्था केली आहे.
सामूहिक अग्निहोत्र हा पर्यावरणासाठी पूरक असा होम असून तो अक्कलकोट शिवपुरी येथील गजानन महाराज यांनी सुरू केलेला आहे. तो सूर्योदय आणि सूर्यास्त अशा दोन वेळेलाच करणे अपेक्षित असतो. असा अग्निहोत्र घरी केल्यास त्यापासून सकारात्मक ऊर्जा तयार होते. विद्यार्थ्यांसाठी याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. हाउसिंग फेडरेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्र मास शिवपुरी येथील डॉक्टर त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार निरंजन डावखरे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
सोसायट्यांसह विद्यार्थ्यांचाही सहभाग
या अग्निहोत्रासाठी वर्तकनगर, शिवाईनगर, शास्त्रीनगर या भागातील अनेक गृहसंकुलांतील रहिवासी सहभाग घेणार आहेत. याच परिसरातील आर.जे. ठाकूर, थिराणी विद्यालय आणि ब्राह्मण विद्यालय या शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थीही आपला सहभाग नोंदविणार आहे. दहा हजार रहिवासी या अग्निहोत्रामध्ये सहभाग नोंदविण्याचे उद्दिष्ट असून त्यातील साडेचार हजार रहिवासी आणि विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचेही राणे यांनी सांगितले.
 या अग्निहोत्रासाठी जोडप्याने एकत्र बसण्याची आवश्यकता नसून कोणतीही व्यक्ती बसू शकते. अग्निहोत्राने पवित्र आणि मंगल झालेल्या वातावरणात ध्यान, उपासना, मनन, चिंतन, अभ्यास करणे सहज साध्य होते. त्याचा उपयोग आपल्या परिसरातील पर्यावरणातील प्रदूषण कमी होऊन आॅक्सिजनमध्ये वाढ होते. त्याचप्रमाणे कार्बनडायॉक्साइडचे प्रमाण कमी होते. याला शास्त्रीय दृष्टिकोनातूनही मान्यता आहे. संपूर्ण जगात अनेक ठिकाणी असंख्य कुटुंबे अग्निहोत्राचे आचरण करून त्यापासून लाभ मिळवित असल्याचा दावाही राणे यांनी केला.

Web Title:  Housing Federation in Thane to set up an environmentally friendly collective fire hydrant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.