रेल्वे झोपडपट्टी बाधितांच्या पुनर्वसनासाठी गृहनिर्माण तयार - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 04:46 PM2022-02-18T16:46:46+5:302022-02-18T17:03:31+5:30

Jitendra Awhad : एसआरएच्या माध्यमातून विकास करू शकतो, रेल्वे आणि गृहनिर्माण एकत्र आलो तर त्यादृष्टीकोणातून येथील लाखो रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

Housing ready for rehabilitation of railway slum dwellers - Jitendra Awhad | रेल्वे झोपडपट्टी बाधितांच्या पुनर्वसनासाठी गृहनिर्माण तयार - जितेंद्र आव्हाड

रेल्वे झोपडपट्टी बाधितांच्या पुनर्वसनासाठी गृहनिर्माण तयार - जितेंद्र आव्हाड

Next

ठाणे - राज्याचे गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी रेल्वे मंत्र्यांना निवेदनही दिले. या निवेदनाद्वारे रेल्वे ट्रॅकच्या कडेला असलेल्या झोपडीधारकांवर कोणत्याही स्वरुपात अन्याय होणार नाही, त्यादृष्टीने विचार करण्याची मागणीही त्यांनी केली.

सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयातच असे आहे की, राज्य शासनाची पुनर्वसनाची योजना असेल तर ती योजना स्वीकृत करुन त्याची अंमलबजावणी करा, त्यानुसार मी गृहनिर्माणमंत्री असल्याने त्यानुसार एसआरएच्या माध्यमातून विकास करू शकतो, रेल्वे आणि गृहनिर्माण एकत्र आलो तर त्यादृष्टीकोणातून येथील लाखो रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. एकूणच येथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी गृहनिर्माण तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Housing ready for rehabilitation of railway slum dwellers - Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.