कसा येईल कोरोना नियंत्रणात?, ST डेपोतील १७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 07:01 PM2020-09-05T19:01:14+5:302020-09-05T19:02:14+5:30
विश्रांती गृहाची क्षमता २०, दाटीवाटीने राहतात ६० जण, सोशल डिस्टसिंगचा फज्जा आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात, कर्मचाऱ्यांना पगारही नाही
ठाणे -कल्याण एसटी डेपोत आत्तार्पयत १७ वाहक चालक कर्मचा:यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र एसटी डेपो प्रशासनाकडून त्याची गंभीर दखल घेतली जात नाही. त्यामुळे ३०० कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. डेपोच्या विश्रंती गृहांची क्षमता २० कर्मचाऱ्यांची असताना त्याठिकाणी ६० कर्मचारी दाटीवाटी राहत आहेत. त्यामुळे डेपोत सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे कसा काय कोरोना नियंत्रणात येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. या सगळ्य़ा प्रकारामुळे कर्मचा:यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
डेपोतील कर्मचारी भगवान आवटे यांनी सांगितले की, डेपोतील विश्रमगृहाची क्षमता २० कर्मचा:यांची आहे. त्यात ६० कर्मचारी दाटीवाटीने राहतात. एकमेकांच्या शेजारी विश्रंती घेतात. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची स्वच्छता ठेवली जात नाही. आत्तार्पयत १७ कर्मचा:यांना कोरोनाची लागण झालेली आहे. कालच आणखीन एका कर्मचा:याला कोरोनाची लागण झाली. आज पुन्हा एका कर्मचा:याला ताप आला आहे. याठिकाणी कर्मचा:यांना सॅनिटायझर, मास्क दिला जात नाही. विश्रंतीगृह निजर्तूकीकरण केले जात नाही. केवळ पांढरी पावडर मारुन स्वच्छता केल्याचे भासविले जात आहे. गेल्या पाच महिन्यापासून कर्मचा:यांचा पगार मिळालेला नाही. कोरोना काळात कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा काय करायचा असा प्रश्न कर्मचारी वर्गापुढे आहे.
कर्मचारी अतुल अहिरे यांनी सांगितले की, डेपोत जवळपास 300 कर्मचारी काम करतात. यापूर्वी ७० पेक्षा जास्त फे:या चालविल्या जात होत्या. कोरोना काळात केवळ सरकारी कर्मचारी, डॉक्टर, नर्स यांच्यासाठी बसेस चालविल्या जात होत्या.कोरोना काळात जीवाची पर्वान करता कामगारांनी काम केले. त्यांना कोरोनाकाळातील १२७ दिवसांचा पगार अद्याप दिलेला नाही. काही कर्मचा:यांना पाच महिन्याचा पगार मिळालेला नाही. प्रशासनाकडून केवळ चालढकल केली जात आहे. त्यामुळे कर्मचा:यांनी जगायचे कसे असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान डेपो व्यवस्थापक विजय गायकवाड हे आज सुट्टीवर असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र उपस्तित अधिका:यांनी सांगितले की, कोरोना काळात मुंबई, ठाणो आणि पालघर डेपोतील कर्मचा:याना कामावर हजर राहण्यास सांगितले होते. त्यापैकी केवळ १८ टक्केच कर्मचारी हजर होते. त्यांना पगार दिला आहे. अन्य कर्मचा:यांचा पगारही वरिष्ठांच्या आदेशानुसार दिला जाईल. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी काय उपाय योजना केल्या जातात हे स्पष्ट केले नाही.