राज्यातील किती नेत्यांवर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरची टीका केली; परांजपेंचा आव्हाड यांना सवाल

By अजित मांडके | Published: December 6, 2023 08:01 PM2023-12-06T20:01:40+5:302023-12-06T20:02:04+5:30

जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या ढेरी वरून टीका केल्यानंतर परांजपे यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला केला आहे.

How many leaders in the state were criticized at a personal and low level Paranjpencha asked Awad |  राज्यातील किती नेत्यांवर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरची टीका केली; परांजपेंचा आव्हाड यांना सवाल

 राज्यातील किती नेत्यांवर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरची टीका केली; परांजपेंचा आव्हाड यांना सवाल

ठाणे: वैयक्तिक टीकेवरून जितेंद्र आव्हाड यांना त्रास झाला. मात्र त्यांनी आता पर्यंत राज्यातील किती नेत्यांवर वयक्तिक आणि खालच्या पातळीवरची टीका केली याची आठवण आता आम्ही करू देऊ का असा सवाल करीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या ढेरी वरून टीका केल्यानंतर परांजपे यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला केला आहे. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदमध्ये ते बोलत होते. 

अजित पवार यांच्यावर विविध प्रकारचे आरोप झाले त्यावेळी मी पुढे होतो असे आव्हाड म्हणतात. मात्र त्यावेळी अजित पवार यांना आव्हाड यांची गरज नव्हती, आव्हाड याना स्वतःची ओळख हवी होती, महाराष्ट्रात त्यांना कोण ओळखत नव्हते म्हणून त्यांनी स्वतःची पोळी भाजण्याचे काम केल्याची टीकाही परांजपे यांनी केली. २००९ मध्ये जेव्हा आव्हाड पहिल्यांदा निवडून आले होते, तेव्हा त्यांच्या मतदार संघात सर्वात जास्त निधी हा अजित पवार यांनीच दिला होता याची आठवण ही त्यांनी करून दिली. विनय भणाची केस होती, तेव्हा आपण आमदारकीचा राजीनामा दिला होता तेव्हा तुमची मनधरणी करायला तुमच्या बंगल्यावर अजित पवार साडेतीन तास हजर होता हे विसरलात का ? असा सवालही त्यांनी केला. आपण केवळ अजित पवार यांचा द्वेश करीत आला आहात आजही तेच करत असल्याचे ही ते म्हणाले.
 

Web Title: How many leaders in the state were criticized at a personal and low level Paranjpencha asked Awad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.