शिक्षक आमदारकीला कितीही करा खर्च

By Admin | Published: January 24, 2017 05:40 AM2017-01-24T05:40:31+5:302017-01-24T05:40:31+5:30

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचा एकंदर पसारा पाहून असेल, पण या निवडणुकीतील उमेदवारांना निवडणूक आयोगाने खर्चाचे

How much does the teacher's MLA spend | शिक्षक आमदारकीला कितीही करा खर्च

शिक्षक आमदारकीला कितीही करा खर्च

googlenewsNext

सुरेश लोखंडे / ठाणे
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचा एकंदर पसारा पाहून असेल, पण या निवडणुकीतील उमेदवारांना निवडणूक आयोगाने खर्चाचे कोणतेही बंधन घातलेले नाही. मात्र विविध स्वरूपाच्या मर्यादा आयोगाने घालून दिल्या आहेत. सोशल मीडियाचा प्रचारासाठी वापर करायचा असेल, तर मात्र उमेदवारांना रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे.
या निवडणुकीसाठी विविध पक्ष-आघाडीचे दहा उमेदवार रिंगणात आहेत. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात या मतदारसंघांचा अवाढव्य पसारा आहे. मतदारसंघाचा आकार पाहता उमेदवारांचा सर्वाधिक भर सोशल मीडियावर असेल. उमेदवारांच्या सभा, बैठका नियमित सुरू आहेत. पण सोशल मीडियावरील प्रचारसाहित्य, लिखाण, त्यातील मुद्दयांची तपासणी करून घेण्याची सक्ती उमेदवारांवर आहे. त्यासाठी पाचही जिल्ह्यात मीडिया सर्टिफिकेशन अ‍ॅन्ड मॉनिटेरिंग कमिटी (एमसीएमसी) स्थापन केली आहे. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष असतील. फेसबुकवर अकाऊंट ओपन करण्यासाठी, व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपसाठीही उमेदवाराला या कमिटीची परवानगी घ्यावी लागेल.

Web Title: How much does the teacher's MLA spend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.