मनसेचे निवडणूक कार्यालय हायटेक

By admin | Published: January 24, 2017 05:41 AM2017-01-24T05:41:52+5:302017-01-24T05:41:52+5:30

सध्या डिजिटलायझेशनचा गवगवा सर्वत्र होत असताना त्याची कास मनसेने धरली आहे. ठाण्यातील पक्षाचे निवडणूक कार्यालय हायटेक

HSE's election office of MNS | मनसेचे निवडणूक कार्यालय हायटेक

मनसेचे निवडणूक कार्यालय हायटेक

Next

ठाणे : सध्या डिजिटलायझेशनचा गवगवा सर्वत्र होत असताना त्याची कास मनसेने धरली आहे. ठाण्यातील पक्षाचे निवडणूक कार्यालय हायटेक होणार असून या कार्यालयाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लवकरच होणार आहे.
मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध फंडे आजमावले जात आहेत. प्रचारासाठी राजकीय पक्षांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. सर्वांपेक्षा वेगळे आपले कार्यालय असावे, यासाठी मनसे आता डिजिटलायझेशनकडे वळली आहे. घंटाळी परिसरात हे कार्यालय असेल. निवडणूक कार्यालयाच्या पुढच्या भागात ४४ बाय साडेनऊ फुटांची स्क्रीन लावली असून तीवरून राज यांची भाषणे, मनसेने नाशिक येथे केलेली कामे, पक्षाचा प्रचार नागरिकांना दाखवला जाईल. तसेच, कार्यालयात व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक सिस्टीम आणली जाणार आहे. ठाण्यातील मतदारांचा डाटा जमवण्यात आला असून मनसेचे ठाण्याचे व्हिजन काय असेल, एखादा कार्यक्रम हे सोशल मीडियावर सर्व मतदारांना पाठवली जाणार आहे. या कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार असल्याचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: HSE's election office of MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.