भिवंडीत बँक बाहेर नागरिकांची प्रचंड गर्दी ; सोशल डिस्टनसिंगचा उडाला फज्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 02:09 PM2021-04-07T14:09:56+5:302021-04-07T14:10:24+5:30
नागरिकांना गर्दी करू नये असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी प्रशासनाच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून पैसे काढण्यासाठी नागरिकांनी बँके समोर मोठी गर्दी करत आहेत.
- नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी शहरात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने शहरात मनपा व पोलीस प्रशासनाकडून कडत निर्बध लागू केले आहेत. नागरिकांना गर्दी करू नये असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी प्रशासनाच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून पैसे काढण्यासाठी नागरिकांनी बँके समोर मोठी गर्दी केल्याचे चित्र शहरातील जकात नाका परिसरात असलेल्या एसबीआय बँक समोर सकाळ पासून पाहायला मिळत आहे.
लॉकडाऊनच्या भीतीने अत्यावश्यक गरजा व किराणा आदी कामांसाठी पौसे लागणार असल्याने नागरिकांनी बँकमधून पैसे काढण्यासाठी एसबीआय शाखेत मोठी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे बँक प्रशासनाकडून या गर्दीला आवर घालण्यासाठी तसेच सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्यासाठी कोणतीही सुविधा करण्यात आलेली दिसत नाही. त्यातच या ब्यांकेत रोजची गर्दी असूनही ब्यांक कर्मचारी कामात ढिसाळपणा करत असल्याची ओरड रांगेत उभे असलेले नागरिक करीत असतात तसेच या बँकचे सर्व्हर देखील नेहमीच संथ गतीने काम करत असल्याने नागरिकांना तासंतास ब्यांकेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. नागरिकांच्या या गैरसोयी संदर्भात एसबीआय बँक कडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने बँक बाहेर सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडाला आहे.