भिवंडीतील कशेळी येथील फर्निचर गोदामाला भीषण आग, सर्व फर्निचर जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 07:42 PM2021-03-09T19:42:56+5:302021-03-09T19:44:02+5:30

गोडाऊनमध्ये लाकडी फर्निचर असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते यामुळे गोदामातील सोफासेट, लाकडी दरवाजे, शोभेच्या वस्तू जाळून खाक झाल्या आहेत. या गोदामामध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते. यावेळी वेल्डिंगची ठिणगी थर्माकोलवर पडल्याने ही आग लागली. ( huge fire broke out at the furniture warehouse)

A huge fire broke out at the furniture warehouse at Kasheli in Bhiwandi | भिवंडीतील कशेळी येथील फर्निचर गोदामाला भीषण आग, सर्व फर्निचर जळून खाक

भिवंडीतील कशेळी येथील फर्निचर गोदामाला भीषण आग, सर्व फर्निचर जळून खाक

Next

ठाणे- भिवंडीतील (Bhiwandi) आगीचे सत्र थांबण्याचे नाव नाही. येथे कशेळी येथील चामुंडा कंपाउंडमधील श्री जी फर्निचरच्या गोदामाला (furniture warehouse) मंगळवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये गोदामातील संपूर्ण फर्निचर जळून खाक झाले आहे. घटनास्थळी ठाणे महानगरपालिका अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (A huge fire broke out at the furniture warehouse at Kasheli in Bhiwandi)

गोडाऊनमध्ये लाकडी फर्निचर असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते यामुळे गोदामातील सोफासेट, लाकडी दरवाजे, शोभेच्या वस्तू जाळून खाक झाल्या आहेत. या गोदामामध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते. यावेळी वेल्डिंगची ठिणगी थर्माकोलवर पडल्याने ही आग लागली. यात संपूर्ण फर्निचर गोदाम जळून खाक झाला असल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून तब्बल २ तासांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

भिवंडीत केमिकल गोदाम, सायजिंग, डाईंग व यंत्रमाग तसेच मोती कारखाने मोठ्या प्रमाणात असून मार्च महिना उजाडला, की या ठिकाणी आग लागण्याच्या घटना नेहमीच घडतात. यामुळे नेमकी मार्च महिन्यात लागणाऱ्या या आगी अचानक लागतात की इन्शुरन्स मिळविण्यासाठी लावल्या जातात हा सवाल कायम अनुत्तारीतच आहे. यामुळे या आगीचे नेमकी कारण काय याविषयी सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. 

त्यातच भिवंडीतील ग्रामीण भागात गोदाम पट्टा मोठ्या प्रमाणात फोफावला असून या गोदामात स्वतंत्र अग्निसुरक्षा करण्यात आलेली नसल्याने भिवंडी मनपाच्या अग्निशमन दलावर या आगीची जबाबदारी असते. त्यातच आगीचे नेमकी कारण समजत नसल्याने भविष्यात जर एखादी मोठी आगीची दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल सामान्य नागरिक विचारात आहेत .   
 

Web Title: A huge fire broke out at the furniture warehouse at Kasheli in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.