पाथर्लीतील हेल्थ सेंटरमधील रक्तदानाला उदंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:27 AM2021-07-04T04:27:03+5:302021-07-04T04:27:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : ‘लोकमत’तर्फे स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राबवण्यात येत असलेल्या ‘नातं ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : ‘लोकमत’तर्फे स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राबवण्यात येत असलेल्या ‘नातं रक्ताचं, या रक्तदानाच्या महायज्ञाला डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिड टाऊन, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटी आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन युथ यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्वेतील पाथर्ली येथील हेल्थ सेंटरमध्ये शुक्रवारी मोठ्या उत्साहात हे शिबिर पार पडले. यावेळी विविध संस्थांच्या प्रतिनिधींसह नागरिकांनी असे मिळून एकूण ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान,’ असा संदेश दिला.
कोरोनाच्या महामारीने मार्च २०२० पासून सर्वत्र कहर केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी रक्ताचा मोठा तुटवडा भासला होता. आता लवकरच तिसरी लाट येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी नागरिकांनी या रक्तदानाच्या महायज्ञेत सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन या शिबिराच्या वेळी आयोजकांतर्फे करण्यात आले. या शिबिरात तरुणांपासून ज्येष्ठांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत रक्तदान करून सामाजिक भान जपले.
... यांनी केले रक्तदान
या शिबिरात जितेंद्र नेमाडे, सविता नाझरे, प्रसाद खोत, अजय जोशी, अभिषेक पी, माधुरी जोशी, बळवंत जोशी, अतुल कुवळेकर, विष्णू सातवसे, श्रीकांत सत्यमूर्थी, सुहास साने, रश्मी मुंडके, मंदार सोमण, स्वप्निल जाधव, तेजस म्हात्रे, अभिजित पंडित, प्रशांत आंबेकर, अजय कुलकर्णी, अद्वैत चांदसरकर, सुरेंद्र जोशी, संदीप बारवकर, विकी प्रधान, वासुदेव तिवारी, संदीप प्रधान, दिपक कोरगावकर, अतिश कुलकर्णी, विनोद बरी, अजिंक्य जोशी, अतुल देसाई, महेश शिंदे आदींनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
-----------------