कामवारी नदीच्या संवर्धनासाठी केली मानवी साखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:13 AM2019-01-30T00:13:55+5:302019-01-30T00:14:12+5:30

दूषित पाण्यामुळे गटारगंगा; महाविद्यालयांचा पुढाकार, भिवंडीच्या नागरिकांमध्ये केली जाणार जनजागृती

Human chain for the conservation of the Kamvari river | कामवारी नदीच्या संवर्धनासाठी केली मानवी साखळी

कामवारी नदीच्या संवर्धनासाठी केली मानवी साखळी

Next

भिवंडी : कामवारी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी सोडल्याने नदीची गटारगंगा झाली आहे. तसेच नदीपात्रात अतिक्रमण केल्याने नदी नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे. तिला वाचविण्यासाठी ओसवाल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्नेहल दोंदे यांनी कामवारी बचाव मेहीम हाती घेतली आहे. यासाठी ओसवाल महाविद्यालय व अक्सा गर्ल्स महाविद्यालय येथील एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. या मोहिमेबाबत नागरिकांंमध्ये जागृती करण्याच्या निमित्ताने त्यांनी कामवारी नदी वाचविण्यासाठी प्रजासत्ताक दिनी मानवी साखळी तयार केली होती.

कामवारी नदीचा उगम तालुक्यातील देपोली येथे होऊन ३४ किलोमीटर प्रवाह वाहत भिवंडी शहराजवळील खाडीपात्रात मिसळते. या नदीपात्रात बारमाही पाणी टिकावे यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी बंधारे बांधून पाणी अडविण्याची उपाययोजना केली आहे. परंतु शहराच्या सीमेजवळ या नदीपात्रात अतिक्रमण झाल्याने पात्र अरूंद होऊ लागले आहे. तर नदीजवळच्या डाइंग व सायजिंग मधील दूषित पाणी प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडले जाते. तसेच नदीतील पाण्याचा बेकायदा उपसा टँकर माफियांकडून रात्रंदिवस होत असतो. या बाबींकडे महसूल विभाग, प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांचे दुर्लक्ष होत असल्याने या नदीची गटारगंगा झाली आहे.

नदीच्या शुध्दीकरणाची काळजी वेळेत न घेतल्यास काही वर्षात या नदीचा नाला होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी जलपुरूष डॉ. राजेंद्रसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत कामवारी बचाव मोहिमेची माहिती देण्यात आली होती. त्यासाठी समाजात जनजागृती होणे गरजेचे असल्याने प्रजासत्ताक दिनी हा उपक्रम हाती घेतल्याची माहिती डॉ. दोंदे यांनी दिली. त्यानिमित्ताने नदीनाका येथील टिळक घाट ते नदीपात्रातील बंधारा व शेलार ग्रामपंचायत हद्दीतील घाटावर विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार केली होती.

यंत्रणांचे तक्रारींकडे दुर्लक्ष
कामवारी नदीपात्राची होणारी दुरवस्था स्थानिक नागरिक उघड्या डोळ्याने पाहत आहे,अशी खंत नदीशेजारी राहणाऱ्या मुख्तार फरीद कुटुंबियांनी व्यक्त केली. या बाबत फरीद यांनी वेळोवेळी सरकारी पातळीवर तहसीलदार, प्रांत कार्यालयात लेखी तक्र ारी केल्या. परंतु आजपर्यंत अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याचे त्यांनी सांगितले. नदी शुध्दीकरणाचा उपक्र म यशस्वी करण्यासाठी प्राचार्या उनेझा फरीद, प्राध्यापिका फौजिया अन्सारी यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्र माच्या शेवटी पंचायत समिती सभापती रवीना जाधव व महापालिका उपायुक्त वंदना गुळवे यांना निवेदन सादर केले.

Web Title: Human chain for the conservation of the Kamvari river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.