उल्हासनगरमधील बेघरांना माणुसकीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:28 AM2019-09-24T00:28:07+5:302019-09-24T00:28:11+5:30

मानवता ग्रुपची सामाजिक बांधीलकी : एकाकी जगणाऱ्यांना तरुणांचा मदतीचा हात

Humanitarian support for the homeless in Ulhasnagar | उल्हासनगरमधील बेघरांना माणुसकीचा आधार

उल्हासनगरमधील बेघरांना माणुसकीचा आधार

Next

उल्हासनगर : शहरातील फुटपाथ, रस्ते, चौक, रेल्वेस्टेशन, बसस्टॉप आदी ठिकाणी एकाकी आयुष्य व्यतीत करणाºया व्यक्तींना, रुग्णांना मानवता ग्रुपचा आधार मिळत आहे. या ग्रुपतर्फे रक्तदान शिबिरे घेऊन सरकारी रुग्णालये आणि रक्तपेढींना रक्त दिले जात असून त्याचा गरजूंना फायदा होत आहे. सामाजिक जाणीव आणि बांधीलकीतून उच्चशिक्षित तरुण हे सामाजिक कार्य करत आहेत.

उल्हासनगरमधील निलेश बच्छाव, साई जाधव, कुशल नेहते, मयूर कदम आदी तरुणांनी एकत्र येत मानवता ग्रुप तयार केला आहे.
विविध व्याधीग्रस्त नागरिकांची आरोग्यतपासणी तसेच त्यांना अंघोळ घालून स्वच्छ करून नवे कपडे दिले जातात. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचारानंतर त्यांना नातेवाइकांच्या स्वाधीन केले जाते. मात्र, माहिती न मिळाल्यास त्यांची महापालिकेच्या बेघर केंद्रांत व्यवस्था केली जाते. बेघर केंद्र चालविणारे सत्यवान जगताप यांची यात मदत होत असून राहणे, खाणे आणि आरोग्याची काळजी घेतली असल्याने निराधार व्यक्तींना आधार मिळत असल्याचे निलेश बच्छाव यांनी सांगितले.

गरीब आणि गरजू नागरिकांना अनेकदा रक्ताची गरज लागते. रक्तांसाठी त्यांची भटकंती होऊ नये म्हणून ग्रुपचे सदस्य रक्तदान शिबिर घेऊ न शासकीय रुग्णालय व रक्तपेढ्यांंना रक्त देतात. यातून गरीब व गरजू नागरिकांना मोफत रक्तपुरवठा केला जातो. शहरात विविध कार्यक्रमांत अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून ग्रुपच्या सदस्य हॉटेल, मंगल कार्यालय, खाजगी कार्यक्रम आदी ठिकाणी शिल्लक अन्न जमा करून रात्री अर्धपोटींना ते दररोज दिले जात असल्याचे या तरुणांनी सांगितले.

मानवता ग्रुपचे तरुण उच्चशिक्षित
मानवता ग्रुप तयार करून गोरगरिबांची सेवा करणाºया ग्रुपचे सदस्य तरुण व उच्चशिक्षित आहेत. प्रत्येक जण नोकरी व व्यवसाय सांभाळून हे काम करीत आहेत. मानवता गु्रपसोबत असंख्य जण जोडले असून ते मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Humanitarian support for the homeless in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.