पोलिसांमधील माणूसकीने वाचविले गरोदर महिलेचे प्राण
By जितेंद्र कालेकर | Published: July 28, 2023 07:34 PM2023-07-28T19:34:18+5:302023-07-28T19:35:26+5:30
पोलिस निरीक्षकाच्या आवाहनानंतर दोन पोलिसांनी केले तात्काळ रक्तदान:वाहतूक शाखेचे असेही कर्तव्य
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: एरव्ही, केवळ आपल्या हद्दीत गुन्हा घडला नसल्याने तो दाखल करण्याला विलंब करणारे किंवा लहान अपराधासाठी चिरीमिरी घेणारे पोलिसही अनेकांनी पाहिले असतील. परंतू, ठाण्यात एका गरोदर महिलेला तातडीने रक्ताच्या दोन बॅगांची गरज असल्याची माहिती मिळताच आपला तो प्रांतच नसल्याची सबब पुढे न करता ठाणे शहर वाहतूक शाखेच्या नौपाडा युनिटच्या दोन अंमलदारांनी तातडीने रक्तदान करुन या महिलेसह तिच्या बाळाचेही प्राण वाचविल्याने या दोघांचेही कौतुक होत आहे.
तीन हात नाका जंक्शन येथे भिवंडीतील कशेळी येथील एक मजूर सुनील शिंदे हे अचानक वाहतूक नियंत्रण शाखेचे नौपाडा युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहिते यांना भेटले. त्यांची पत्नी गरोदर असून तिला प्रसूती करण्यासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. रक्त कमी असल्यामुळे प्रसूतीनंतर ितला दोन बॅग रक्ताची तातडीची आवश्यकता आहे. त्यामुळे रक्तदाते देऊन मदत करावी, अशी कळकळीची विनंती त्याने मोहिते यांना केली. त्याची गरज आणि गांभीर्य लक्षात घेऊन अनोळखी असलेल्या शिंदे यांना मदत करण्यासाठी नौपाडा वाहतूक युनिटच्या सर्व अंमलदार यांना ही माहिती देऊन रक्तदानासाठी आवाहन केले.
या अंमलदारांपैकी अतुल डहाळे आणि सूरज जाधव या दोघांनीही तयारी दर्शविल्यानंतर त्यांना तात्काळ रक्तदान करण्यासाठी पाठविण्यात आले. इतर अंमलदारांनी या कार्यासाठी मदत केली. या महिलेचे ओ पाॅ िझटिव्ह हा रक्तगट हाेता. तर जाधव यांचाही हाच गट हाेता. डहाळे यांचा एबी पाॅझिटीव्ह गट हाेता. डहाळे यांचा गट जुळला नसला तरी त्यांनी रक्तदान केल्याने त्यांना एक बॅग िमळाली. त्यात जाधव यांची बॅग मिळाली. दरम्यान, तिची प्रसुती हाेउन मुलगाही झाला. दाेघांनीही वेळीच रक्त दान केल्याने प्रसुतीनंतर तिच्यासह बाळाचाही जीव वाचला. कोणत्याही वरिष्ठ नेता किंवा अधिकार्याने शिफारस केलेली नसतांनाही पोलिसांनी इतक्या तातडीने केलेल्या या मदतीने शिंदे कुटूंबीय चांगलेच भारावले. त्यांनी ठाणे शहर पोलिसांचे आभार व्यक्त केले. आम्ही केवळ आमचे कर्तव्य केले. यातून वेगळे समाधान मिळाले, अशी प्रतिक्रीया पोलिस निरीक्षक मोहिते यांनी लोकमत जवळ व्यक्त केली.