बदलापूरमध्ये माणुसकीची भिंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:32 AM2018-10-29T00:32:11+5:302018-10-29T00:32:37+5:30
विविध सामाजिक संघटनांचा पुढाकार; नको असलेल्या वस्तू देण्याचे केले आवाहन
बदलापूर : नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा... अशा अवघ्या दोन वाक्यांचा संदेश देत बदलापूरच्या पूर्वेला उड्डाणपुलाखाली माणुसकीची भिंत नावाचा उपक्र म सुरू करण्यात आला आहे. बदलापूरमधील विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने हा उपक्र म सुरू करण्यात आला असून यात आपल्याकडील नको असलेल्या वस्तू देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हिवाळा सुरू होत असल्याने गरिबांना ऊबदार कपडे मिळावेत, यासाठी याठिकाणी जुने ऊबदार कपडे ठेवण्याचे आवाहन केले आहे.
काही दिवसांपासून वातावरणात गारवा जाणवत आहे. मात्र, या थंडीत बेघर, गोरगरीब अशा डोक्यावर छप्पर नसलेल्यांचे हाल होतात. कुडकुडत रात्र काढावी लागत असल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी युथ आॅफ टुडे फाउंडेशन, बदलापूरकर ग्रुप आणि छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून माणुसकीची भिंत हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
बदलापूर पूर्वेला उड्डाणपुलाखाली आपल्याला नको असलेल्या वस्तू, कपडे, चादरी अशा वस्तू देण्यासाठी आवाहन केले आहे. त्या वस्तू ज्यांना आवश्यकता असेल, त्यांनी घेऊन जाव्यात, असेही सांगण्यात आले आहे. तसेच गरजवंतांना मदतही करू शकता.