सीबीएसई शाळांचा शंभर टक्के निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 02:17 AM2019-05-07T02:17:35+5:302019-05-07T02:17:45+5:30
सीबीएसई दहावीचा निकाल सोमवारी आॅनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यात ठाण्यातील शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
ठाणे : सीबीएसई दहावीचा निकाल सोमवारी आॅनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यात ठाण्यातील शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
न्यू होरायझन हायस्कूलमध्ये १६१ विद्यार्थी परीक्षेस पात्र होते, त्यापैकी २८ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले. ३९ विद्यार्थ्यांनी गुणांची नव्वदी पार केली. या शाळेतील अॅड्री दास या विद्यार्थ्याने ९९.४ टक्के गुणांची कमाई करून शहरातून प्रथम येण्याचा मान पटकाविला. लोकपुरम हायस्कूलमध्ये २०८ विद्यार्थी परीक्षेस पात्र होते, त्यापैकी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी ३२ असून, ४७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांचा टप्पा गाठला. ९७.८ टक्के गुणांसह प्रणव कुलकर्णी आणि सुधिक्षा माल्या हे विद्यार्थी शाळेतून अग्रस्थानी आहेत. डीएव्ही स्कूलमध्ये ४१५ विद्यार्थी परीक्षेस पात्र होते, त्यापैकी ९८.८ टक्के मिळवित गीतांजली जैन हिने प्रथम स्थान मिळवले. रेन्बो हायस्कूलच्या यंदाच्या पहिल्याच बॅचचा शंभर टक्के निकाल लागला. ४३ विद्यार्थी परीक्षेस पात्र होते, त्यापैकी ९६.६ टक्के गुणांसह आर्यन गुलानीने प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले. अरुणोदय हायस्कूलनेही शंभर टक्के निकालाचे लक्ष्य गाठले. या शाळेचे ८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ओजस तुरेकर याने ९६.६ टक्के गुणांसह प्रथम स्थान मिळविले. केंद्रीय विद्यालयात ९० विद्यार्थी परिक्षेस पात्र असून शंभर टक्के निकाल मिळविण्यात शाळेला यश मिळाले आहे. रिती सिंग आणि टिएस व्यंकट नारायण हे ९७ टक्क्यांसह शाळेत अव्वल आले.