उल्हासनगरात वॉकथॉन मध्ये शेकडोजन सहभागी
By सदानंद नाईक | Published: April 7, 2023 05:55 PM2023-04-07T17:55:51+5:302023-04-07T17:56:01+5:30
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून समृद्धी फाऊंडेशन व माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारीसकाळी वॉकेथॉनचे आयोजन केले.
उल्हासनगर :
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून समृद्धी फाऊंडेशन व माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारीसकाळी वॉकेथॉनचे आयोजन केले. शेकडो नागरिकांनी आरोग्य ठणठणीत राहण्यासाठी वॉकेथॉन मध्ये सहभाग घेतला.
उल्हासनगरातील नागरिकांत आरोग्या बाबत जनजागृती होण्यासाठी रोज रिकाम्या पोटी तीन किलोमीटर चालल्यास, मधुमेह व रक्तदाब हा नियंत्रित ठेवला जातो. हा संदेश देण्यासाठी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रदीप गोडसे यांनी दिली. वॉकेथॉन मध्ये शेकडो जणांनी सहभाग घेतला. सहभागी झालेल्या सर्वांना वॉकथॉन मध्ये सहभागी झाल्याबाबत प्रमाणपत्र देण्यात आले. उत्कृष्ट तीन व्यक्तींना निवडून पारितोषिक देण्यात आले.
वॉकेथॉन हे लालचक्की चौक पासून सुरुवात करत व्हीनस मार्गे नेताजी चौक ते रामरक्षा हॉस्पिटल व व्हीनस मार्गे लालचक्की चौक येथे समाप्त करण्यात आली. सुरक्षेचा उपाय म्हणून वॉकेथॉन दरम्यान रुग्णवाहिका, डॉक्टर आदींची सुविधा देण्यात आली होती. सहभागी झालेल्या नागरिकांना टी शर्ट, पाणी, व नाश्त्याची सोय उपलब्ध करून दिली होती.