Thane: उल्हासनगर भाजपात शेकडो व्यापाऱ्यांचा प्रवेश
By सदानंद नाईक | Updated: November 24, 2023 18:47 IST2023-11-24T18:47:07+5:302023-11-24T18:47:28+5:30
Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील टॉउन हॉल मध्ये गुरवारी रात्री बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शेकडो व्यापाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला.

Thane: उल्हासनगर भाजपात शेकडो व्यापाऱ्यांचा प्रवेश
- सदानंद नाईक
उल्हासनगर - शहरातील टॉउन हॉल मध्ये गुरवारी रात्री बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शेकडो व्यापाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी आमदार कुमार आयलानी, भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, जमनुदास पुरस्वानी, व्यापारी संघटनेचे नेते जगदीश तेजवानी आदीजन उपस्थित होते.
उल्हासनगरात भाजप कार्यकारणी सक्रिय झाली असून विविध उपक्रम राबवित आहेत. व्यापाऱ्यात दबदबा ठेवण्यासाठी भाजपने व्यापारी नेता जगदीश तेजवानी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो व्यापाऱ्यांना गुरवारी भाजपात प्रवेश दिला आहे. टॉउन हॉल मध्ये झालेल्या व्यापारी प्रवेश बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित झाला. चव्हाण यांनी व्यापार्यांच्या मागे भाजप उभा राहत असून त्यासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. आमदार कुमार आयलानी, भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, माजी शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, भाजपा नेते नरेंद्र राजांनी, व्यापारी नेता जगदीश तेजवानी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, व्यापारी मंडळाचे पदाधिकारी व व्यापारी यावेळी उपस्थित होते.