सगळंच गेलं की हो! आता जगायचं कसं ते सांगा?; उल्हासनगरातील बेहाल पुरग्रस्तांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 04:44 PM2021-07-22T16:44:51+5:302021-07-22T16:45:18+5:30

उल्हासनगरातील अनेक भागांना पुराचा फटका, शेकडो जण बेघर, महापालिका शाळेत आश्रय

hundreds of people suffers in ulhasnagar after river water entered in home due to heavy rain | सगळंच गेलं की हो! आता जगायचं कसं ते सांगा?; उल्हासनगरातील बेहाल पुरग्रस्तांचा सवाल

सगळंच गेलं की हो! आता जगायचं कसं ते सांगा?; उल्हासनगरातील बेहाल पुरग्रस्तांचा सवाल

Next

- सदानंद नाईक

उल्हासनगर : शहरातील वालधुनी नदी किनाऱ्यावरील मीनाताई ठाकरेनगर, प्रबुद्धनगर, करोतीयानगर आदी परिसरतील शेकडो जणांना उल्हास नदीच्या ब्लॅक पाण्याचा फटका बसला. शेकडो जणांच्या घरात पाणी घुसल्याने, त्यांच्यात एकच धावपळ उडाली. लहान मुले, वृद्ध, महिला आदींना आपत्कालीन पथकांच्या जवानांनी बोट रबरी ट्यूबने बाहेर काढण्यात आले. 

उल्हासनगरच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पुराचा सर्वाधिक धोका किनाऱ्यावरील झोपडपट्टीला असतो. मात्र बुधवारी रात्री २ वाजण्याच्या दरम्यान नदीचे पाणी भारतनगर, सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, दुर्गानगर आदी परिसरात पाणी घुसल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान उल्हास नदीचे काळे पाणी वालधुनी नदीत आल्याने करोतीयानगर, प्रबुद्धनगर, सी ब्लॉक, मीनाताई ठाकरे नगरात घुसल्याने, नागरिकांत पळापळ सुरू झाली. महापालिकेच्या आपत्कालीन विभागाला पुराचे पाणी झोपडपट्टी परिसरात घुसल्याची माहिती मिळताच, पथकाने धाव घेऊन पुरात अडकलेल्या वृद्ध, महिला, लहान मुलासह नागरिकांना बाहेर काढण्यात आले. महापालिका शाळे मध्ये बेघर झालेल्या नागरिकांना ठेवण्यात आले. 

महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे, आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके आदींनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. बेघर झालेल्या नागरिकांना राहणे व जेवणाची व्यवस्था महापालिकेने केली असून अनेक सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्या. घरातील सर्व साहित्य, अन्नधान्य, टीव्ही व इतर इलेक्ट्रिक साहित्य खराब झाले. आता जगायचे कसे? असा प्रश्न शेकडो नागरिका समोर उभा ठाकला असून शासनाने त्वरित मदत करण्याची मागणी होत आहे. बेघर झालेल्या नागरिकांत वृद्ध, लहान मुले, बिमार नागरिकांची गैरसोय होत असून महापालिकेनेही मदतीसाठी पुढे येण्याची मागणी होत आहे. महापालिका बेघर झालेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे संकेत महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. 

सामाजिक संस्था व दानशूरांनी पुढे यावे- उपमहापौर
 शहरातील शेकडो जनाला पुराचा फटका बसला असून अश्यावेळी शासनासह सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी पुढे यावे. असे आवाहन उपमहापौर भगवान भालेराव यांनी केले. महापालिका पुराचा फटका बसलेल्या नागरिकां सोबत असून जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भालेराव म्हणाले.

Web Title: hundreds of people suffers in ulhasnagar after river water entered in home due to heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस