रस्ता रुंदीकरणात आता शेकडो झाडांवर कुऱ्हाड?
By admin | Published: February 5, 2016 02:41 AM2016-02-05T02:41:15+5:302016-02-05T02:41:15+5:30
शहरातील कल्याण-अंबरनाथ रस्ता रूंदीकरणाच्या आड येणारी झाडे, विजेचे खांब, रोहित्र हटविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून न्यायालयीन स्थगिती मिळविलेल्या
सदानंद नाईक, उल्हासनगर
शहरातील कल्याण-अंबरनाथ रस्ता रूंदीकरणाच्या आड येणारी झाडे, विजेचे खांब, रोहित्र हटविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून न्यायालयीन स्थगिती मिळविलेल्या १७ दुकानांची सुनावणी सुरू आहे. त्यानंतर शहरात व्यापक कारवाईचे संकेत उपायुक्त नितिन कापडणीस यांनी दिले.
पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी गेली ३ वर्षे रखडलेल्या अंबरनाथ-कल्याण रस्त्याचे रूंदीकरण सुरू केले. प्रचंड पोलीस बंदोबस्तात सुरु असलेल्या या कारवाईला व्यापारी व राजकीय नेते यांनी विरोध केलेला नाही. रस्ता रुंदीकरणाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून झाडे, विजेचे खांब व रोहित्र हटवून उर्वरित रस्ता रुंदीकरण केले जाणार आहे. रूंदीकरणामुळे रस्त्यालगत असणारे पिंपळ, अशोका, आंबा व इतर जातीच्या एकूण ६३ झाडांचा बळी जाणार असल्याचे पालिका सांगत असली तरी प्रत्यक्षात शेकडो झाडांचा बळी जाणार असल्याचे स्थानिक सांगतात. झाडे हटवण्याबाबतचा अहवाल वृक्ष समिती व बांधकाम विभागाला देवून त्यांचा अभिप्राय घेणार असल्याचे सहा. अधिकारी भगवान कुमावत यांनी सांगितले.