हृदयद्रावक! गरम चटणीमध्ये पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 08:03 PM2018-02-20T20:03:29+5:302018-02-20T20:04:38+5:30

घरात तयार केलेल्या चटणीच्या मोठ्या टोपात पडून दीड वर्षीय चिमुकलीचा करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना अंबरनाथमधील शास्त्रीनगर भागात मंगळवारी पहाटे घडली.

Hurried! Death of a half-year-old chimney fall into a hot chutney | हृदयद्रावक! गरम चटणीमध्ये पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

हृदयद्रावक! गरम चटणीमध्ये पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

Next

 अंबरनाथ - घरात तयार केलेल्या चटणीच्या मोठ्या टोपात पडून दीड वर्षीय चिमुकलीचा करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना अंबरनाथमधील शास्त्रीनगर भागात मंगळवारी पहाटे घडली. घरात तयार केलेल्या चटणीच्या मोठ्या टोपात  ही चिमुकली खेळता खेळता पडली. चटणी गरम असल्याने ती 80 टक्के भाजली. तिला लागलीच उपचारासाठी दाखल केले असता तिचा दुपारी मृत्यू झाला. 

  मंगळवारी पहाटे शास्त्रीनगर भागातील रामास्वामी यांच्या घरात हा प्रकार घडला. रामास्वामी हे इटली -वडा विकण्याचा व्यवसाय करतात. सकाळी 8 वाजता ते इटली विकण्यासाठी घराबाहेर पडतात. दररोजप्रमाणो ते पहाटे 4 वाजता उठुन ते इटली,वडा,सांबर आणि टोमॅटोची चटणी तयार करतात. मंगळवारी देखील त्यांनी टोमॅटोची चटणी मोठय़ा टोपात तयार केली होती. हा टोप त्यांनी घरातच एका कोप-यात ठेवले होते. याचवेळी पहाटे 5 वाजता त्यांची मुलगी तनुष्का रामास्वामी ही खेळत खेळत त्या टोपाजवळ आली.

टोपात वाकून बघत असतांना ती त्या टोपातच पडली. तिचा चेह-याचा भाग थेट टोपात गेल्याने ती त्या गरज चटणीमुळे 80 टक्के भाजली. हा प्रकार कळताच त्या मुलीच्या पालकांनी तीला लागलीच रुग्णालयात हलविले. सकाळी तिच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार देखील सुरु झाला. मात्र या अपघातात ती 88 टक्के भाजल्याने दुपारी 1 वाजता तिचा मृत्यू झाला. 
 

Web Title: Hurried! Death of a half-year-old chimney fall into a hot chutney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.