पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला तीन वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 05:28 AM2019-09-01T05:28:37+5:302019-09-01T05:28:58+5:30
ठाणे : लग्नाला पाच वर्षे झाल्यावरही मूल होत नसल्याने पत्नी दक्षा ऊर्फ दक्षता भोये (२२) हिला रॉकेल ओतून पेटवून ...
ठाणे : लग्नाला पाच वर्षे झाल्यावरही मूल होत नसल्याने पत्नी दक्षा ऊर्फ दक्षता भोये (२२) हिला रॉकेल ओतून पेटवून आत्महत्येस भाग पाडणाºया चेतनला स ठाणे जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवून तीन वर्षे कारावासासह २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. तलासरीतील साखरशेत येथे राहणारी मयत दक्षा आणि आरोपी चेतन यांचे लग्न होऊन पाच वर्षे उलटल्यानंतरही त्यांना मूल नव्हते. त्यातून तो तिला मारहाण, शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून तिने २ जून २०१७ रोजी रात्रीच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये ती गंभीररीत्या जखमी झाली होती.
१० जून २०१७ रोजी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी जव्हार पोलिसांनी गुन्हा दाखल करून चेतनला अटक केली होती. हा खटला न्यायाधीश तांबे यांच्या न्यायालयात आल्यावर सरकारी वकील उज्ज्वला मोहोळकर यांनी ११ साक्षीदार तपासले. त्यांची साक्ष, युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्यमानून चेतन याला वेगवेगळ्या तीन गुन्ह्यांत शिक्षा सुनावली. यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन वर्षे आणि १० हजार रुपये दंड ही शिक्षा सुनावली आहे. तो दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद होणार आहे.