मोटारसायकल अपघातात पती ठार, पत्नी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 06:50 AM2021-02-01T06:50:35+5:302021-02-01T06:51:07+5:30
मनोर-पालघर मार्गावर तामसाई फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला मातीचे ढिगारे असून माती रस्त्यावर आल्याने मोटरसायकल घसरून एका विवाहित तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली असून उपचारांसाठी मनोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मनोर - मनोर-पालघर मार्गावर तामसाई फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला मातीचे ढिगारे असून माती रस्त्यावर आल्याने मोटरसायकल घसरून एका विवाहित तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली असून उपचारांसाठी मनोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कैलास बाबुराव कडू (३३) हा बहाडोलीवरून आपल्या पत्नीला कामावर सोडण्यासाठी कुणाल कंपनी तामसाई येथे सकाळी मोटरसायकलवर जात असताना हा अपघात झाला. तामसाई फाट्याजवळ रस्त्यावर माती असल्याने त्याची गाडी घसरली आणि समोरून येणाऱ्या मोटर वाहनाची ठोकर लागल्याने त्यास गंभीर दुखापत झाली आणि त्याचे जागीच निधन झाले. त्याची पत्नी गंभीर आहे. ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला आहे. मनोर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून अधिक तपास मनोर पोलीस करीत आहेत.
दरम्यान, मनोर-पालघर रस्त्याच्या बाजूला साईटपट्टीचे काम सुरू असून दोन्ही बाजूला मातीचे ढिगारे असल्याने ती माती रस्त्यावर आली आहे. यामुळे रस्ता अरुंद झाला आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ये-जा करणारे दुचाकी व चारचाकी व अवजड मोटर वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरम्यान, रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईट पट्टीवर मातीभराव टाकून काम सुरू केले असेल तर त्या ठेकेदाराला पत्र पाठवून कारवाई करू. हे त्यांनी चुकीचे केले आहे. एका बाजूची साईटपट्टी पूर्ण झाल्यावर दुसऱ्या बाजूचे काम करायला पाहिजे, असे एन एच आय. अधिकारी पिंपळकर यांनी सांगितले.
मातीभराव टाकून काम
दरम्यान, रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईट पट्टीवर मातीभराव टाकून काम सुरू केले असेल तर त्या ठेकेदाराला पत्र पाठवून कारवाई करू. हे त्यांनी चुकीचे केले आहे. एका बाजूची साईटपट्टी पूर्ण झाल्यावर दुसऱ्या बाजूचे काम करायला पाहिजे, असे एन एच आय. अधिकारी पिंपळकर यांनी सांगितले.