भिवंडीत जादूटोण्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीवर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 06:43 PM2021-12-22T18:43:07+5:302021-12-22T18:43:21+5:30
इरफान रफिक शेख असे हल्ला करून फरार झालेल्या पतीचे नाव आहे.
भिवंडी- पत्नीवर कोणीतरी जादूटोणा केल्याने ती आपणास त्रास देत असल्याच्या रागातून पती ने घरातील भाजी कापण्याच्या धारदार चाकूने पत्नी वर वार करून पती फरार झाल्याची घटना भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत करवली गावात मंगळवारी रात्री घडली आहे . कुरेशा इरफान शेख असे पतीच्या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर इरफान रफिक शेख असे हल्ला करून फरार झालेल्या पतीचे नाव आहे.
कारीवली गावातील चाळीत इरफान व कुरेशा शेख असे दोघे पती पत्नी राहत असून पती हे दारूच्या नशेत पत्नीस वाद घालुन शिवीगाळ करीत असताना तुझ्या वर कोणीतरी जादूटोणा केला असल्यामुळेच तू मला त्रास देत असल्याचा आरोप इरफान याने आपल्या पत्नीवर करत दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी पत्नीने पतीस वाद थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग मनात ठेवून पतीने पत्नीस ठोशाबुक्याने मारहाण सुरू केली असता पत्नीने पतीचा हात पकडल्याचा राग अनावर झालेल्या पतीने स्वयंपाक घरातील भाजी कापण्याच्या धारदार चाकुने पत्नीच्या गळयावर व डाव्या हातावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून जखमी अवस्थेत पत्नीला सोडून पळून गेला.
सदर प्रकरणी पत्नीने पती विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला प्रकरणी पती इरफान शेख या विरोधात गुन्हा दाखल केला असून तिच्या वर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर पोलीस फरार पतीचा शोध घेत आहेत . पुढील तपस सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एस मागाडे करीत आहेत .