डोंबिवलीत वर्दळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:40 AM2021-04-16T04:40:59+5:302021-04-16T04:40:59+5:30
डोंबिवली: ब्रेक द चेन अंतर्गत बुधवार रात्रीपासून राज्यात संचारबंदी लागू केली. परंतु, नेमके काय उघडे, काय बंद याबाबतची ...
डोंबिवली: ब्रेक द चेन अंतर्गत बुधवार रात्रीपासून राज्यात संचारबंदी लागू केली. परंतु, नेमके काय उघडे, काय बंद याबाबतची माहिती मिळत नसल्याने नागरिकांनी गुरुवारी शहरभर पाहणी करण्याच्या उद्देशाने फेऱ्या मारल्या. त्यामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर वर्दळ दिसून आली.
सातत्याने पोलीस, महापालिका यंत्रणा याबाबत सतर्क करत असूनही सकाळच्या वेळेत नागरिक भाजी खरेदीसाठी बाहेर पडले होते. फडके पथ, चिमणी गल्ली, रामनगर, गोग्रासवाडी, शेलारनाका, ठाकुर्ली पोलीस चौकी, आजदे, सांगाव, सागरली परिसर तसेच पश्चिमेला गरिबाचा वाडा, उमेशनगर, घनश्याम गुप्ते पथ या ठिकाणी दिवसभर वर्दळ दिसून आली. खाद्यपदार्थ, अन्य जीवनावश्यक दुकाने सुरू असल्याने फारसा गोंधळ कुठेही दिसून आला नाही. कपडा, सुवर्ण, इलेक्ट्रिक आदी दुकाने बंद होती.
* रिक्षा, बस वाहतूक सुरू असल्याने त्यांची वाहतूक शहरात सर्वत्र दिसून आली, विविध स्टॅण्डवर रिक्षा दिसून आल्या नाहीत. मात्र, तरीही रिक्षा न मिळाल्याने कोणाचीही गैरसोय झाली नाही, सगळे काही सुरळीत सुरू होते.
* लोकल सेवा सुरू होत्या, गर्दी सकाळच्या वेळी होती. त्यानंतर दुपारी काहीशी कमी झाली असली तरी कामावर जाणारे प्रवासी होतेच. संध्याकाळी चाकरमानी कामावरून घरी परतत असल्याने तेव्हादेखील लोकलमध्ये गर्दी असल्याचे मुंबईतून येणाऱ्या प्रवाशांनी सांगितले.
----///-----/---------