भाजपा आणि आरएसएसच्या भूमिकेशी माझा काही संबंध नाही - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 14:48 IST2018-12-23T14:45:12+5:302018-12-23T14:48:28+5:30
कल्याण-मी जरी भाजपसोबत असलो तरी माझा भाजपा आणि आरएसएसच्या भूमिकेशी संबंध नाही. माझा झेंडा निळा आहे. तो मी कधीही सोडलेला नाही. भाजपसोबत केवळ माजी राजकीय यूती आहे.

भाजपा आणि आरएसएसच्या भूमिकेशी माझा काही संबंध नाही - रामदास आठवले
कल्याण-मी जरी भाजपसोबत असलो तरी माझा भाजपा आणि आरएसएसच्या भूमिकेशी संबंध नाही. माझा झेंडा निळा आहे. तो मी कधीही सोडलेला नाही. भाजपसोबत केवळ माजी राजकीय यूती आहे. ती देखील निवडणूकीपूरतीच असा खुलासा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
कल्याण येथील विठ्ठलवाडी बस डेपोजवळी गंगाधर पानतावणो साहित्यनगरीत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या दुस:या दिवशीच्या पहिल्या सत्रात केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी उपरोक्त विधान केले आहे. जातीयवादी पक्षाच्यासोबत आठवले असल्याने त्यांच्यावर समाजाचा रोष आहे. त्यामुळे आठवले यांनी उपरोक्त खुलासा केला आहे. आठवले यांनी आंबेडकरवादी साहित्य संमेलनात सांगितले की, मी राज्यभरात फिरतो. समाजातील प्राध्यापिक, साहित्यिक यांच्यासोबत पुणे, नागपूर, मुंबई याठिकाणी बैठका घेऊनच भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय माझा एकट्याचा नाही. माझा निळा झेंडा आहे. तो मी कधीही सोडलेला नाही. माझ्या हातात आहे झेंडा निळा, त्यामुळे अनेकांच्या पोटात उठला आहे गोळा. अशी छोटीशी कविताही केली. सगळ्यांना विचारात घेऊन निर्णय घेतला आहे. यापुढेही सगळ्यांना विचारात घेऊनच निर्णय घेतला जाईल असे आठवले यांनी स्पष्ट केले.