मिले सूर मेरा तुम्हारा... तो सूर बने हमारा!

By admin | Published: August 10, 2016 02:51 AM2016-08-10T02:51:35+5:302016-08-10T02:51:35+5:30

भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे देणाऱ्या शिक्षकांची फारशी दखल घेतली जात नाही

I met you mine ... so my heart became ours! | मिले सूर मेरा तुम्हारा... तो सूर बने हमारा!

मिले सूर मेरा तुम्हारा... तो सूर बने हमारा!

Next

जान्हवी मोर्ये, डोंबिवली
भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे देणाऱ्या शिक्षकांची फारशी दखल घेतली जात नाही. त्यांच्यावर एकदा ‘शिक्षक’असा शिक्का
बसला की ते आपली कला सादर करीत नाही. त्यांचे शिष्य मैफल गाजवितात. पण या विद्यार्थ्यांना घडवणारा उपेक्षित राहतो. आर्थिकदृष्ट्या हतबल होतो...
पडद्यामागील या कलाकारांना प्रकाशात आणण्याचे काम भारतीय शास्त्रीय संगीताच्या अभ्यासात आपले जीवन व्यतीत करणारे किरण फाटक यांनी केले आहे. त्यांनी सुमारे ५७ शिक्षकांचा व्हॉटसअ‍ॅप ग्रूप स्थापन केला आहे. या शिक्षकांचा संघ २१ आॅगस्टला स्थापन होत आहे.
रघुवीर नगरातील रोटरी क्लब सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. नूतन संगीत विद्यालयाचे कृष्णराव दसक्कर यांच्या हस्ते या संघाची स्थापना केली जाणार आहे.
या कार्यक्रमात शास्त्रीय गायक महेश कुलकर्णी, वृषाली दाबके (नृत्य), तबलावादक रुपक पवार, संवादिनीवादक मकरंद वैशंपायन, जयश्री आठवले (सुगम संगीत), नेत्रा फडके, अपर्णा फडके, आदिती घैसास, दिनकर म्हात्रे आपली कला सादर करणार आहेत. कलाकरांना मयुरेश फडके, गिरीश आठल्ये, केदार फाटक, मकरंद वैशंपायन, सिध्दार्थ कर्वे साथ करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची देवस्थळी करणार आहेत .
या संदर्भात फाटक यांनी सांगितले की, संगीत शिक्षकांचा संघ स्थापन करण्यासाठी व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. गायन, वादन आणि नृत्य यांचे धडे देणाऱ्या ५७ संगीत शिक्षकांचा ग्रुप तयार झाला. या संघात दोन समित्या असतील. त्यात सल्लागार व कार्यकारिणी समिती यांचा समावेश असेल.
संगीत शिक्षकांची एक सूची तयार केली जाणार आहे. त्यात शिक्षकांचे नाव, तो कोणत्या प्रकारचे संगीत शिकवितो, त्याचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक याची माहिती दिली जाईल. शिक्षक हा सुद्धा कलाकार असतो. मात्र त्याला व्यासपीठ मिळत नाही. त्याला कार्यक्रम मिळत नाही. कारण त्यांच्यावर शिक्षकाचा शिक्का मारला गेलेला असतो.
या संगीत शिक्षक संघाचा दर
दोन महिन्यांनी एक कार्यक्रम होणार आहे. त्यात सहा संगीत शिक्षकांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. त्यांनी काय सादर करावे याचे त्यांच्यावर बंधन नसेल. तसेच शिक्षकांचा शिष्यांसाठीही कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमासााठी प्रसिद्ध कलाकार, तिकीट लावणे असा कोणताही प्रकार केला जाणार नाही, असेही फाटक यांनी स्पष्ट केले.

Web Title: I met you mine ... so my heart became ours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.