मी ६० व्या वर्षी सायकलिंगला सुरूवात केली : अरुणा लागू
By प्रज्ञा म्हात्रे | Published: March 30, 2024 08:30 PM2024-03-30T20:30:56+5:302024-03-30T20:31:21+5:30
जागतिक महिलादिनानिमित्त लागू यांना आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनच्या वतीने रणरागिणी जीवन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ठाणे : मी वयाच्या ४० व्या वर्षी ट्रेकिंग तर ६० व्या वर्षी सायकलिंगला सुरूवात केली. महिलांनी घर सांभाळून आपले छंद जोपासले पाहिजे मग तो कोणतीही छंद असो. ज्या छंदामध्ये आपण रमत आहात, तो छंद तुम्ही जोपासली की तुमचे मानसीक आरोग्य सुदृढ राहते असा कानमंत्र रणरागिणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित, सुप्रसिद्ध सायकलपटू अरुणा लागू यांनी दिला.
जागतिक महिलादिनानिमित्त लागू यांना आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनच्यावतीने रणरागिणी जीवन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वयाच्या ६७ व्या वर्षीही आपली सायकलिंगची आवड दजोपासणाऱ्या आणि आतापर्यंच ६५ हजार किमींच्यावर सायकलिंगचा टप्पा पार करणाऱ्या लागू यांची मुलाखत शनिवारी पार पडली. ठाणे नगर वाचन मंदिर आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, महिलांवर संसाराची जबाबदारी अधिक असते पण या जबाबदाऱ्या पूर्ण करताना त्यांनी ट्रेकिंग किंवा सायकलिंगच केले पाहिजे असे नाही पण कोणतीतरी कला मा६ जोपासली पाहिजे. मी वयाच्या ४० व्या वर्षी ट्रेकिंगला सुरूवात केली जसजसा घरातल्या जबाबदाऱ्या कमी होत गेल्या तसे एकीकडे मी संगीत विशारद, योगमामध्ये डिप्लोमा केला. वयाच्या १७-१८ व्या वर्षी माझ्या मुलीने मुंबई ते गोवा, ठाणे ते पाली, अष्टविनायकपर्यंत सायकलिंग केली. त्यावेळी मी तिला पाठिंबा दिला होता. परंतू ती नंतर अभ्यास आणि मग नोकरीत व्यस्त झाली. मी सायकल हातात घेतली ती तब्बल ४२ वर्षांनी सुरूवातीला मी एक किमी पासून ५,१० किमी पर्यंत चालवायचे. मग जसा आत्मविश्वास वाढला तसा बाजारहाट पण सायकलवर करु लागले. मग गर्दीत सायकलिंग चालविण्याची सवय झाली. ज्यावेळी मी व्यवस्थित सायकलिंग चालवू शकते असा आत्मविश्वास निर्माण झाला, तेव्हा मी सायकलिंग एक्सपिडीशनमध्ये सहभाग घेऊ लागली. आता मी नियमीत सायकलिंग करत असल्याचे लागू यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश कासार, हेमंत दिवेकर, विना चव्हाण व इतर सभासद वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होते.