'मला बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र घडवायचाय, तुमचा आशीर्वाद हवाय'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 05:26 PM2019-09-17T17:26:12+5:302019-09-17T17:28:58+5:30

जनआर्शीर्वाद यात्रा मी दरवर्षी काढणार आहे, लोकांना गावागावात जाऊन भेटणार आहे.

'I want to create unemployment free Maharashtra, I want your blessing', Aaditya thackeray | 'मला बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र घडवायचाय, तुमचा आशीर्वाद हवाय'

'मला बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र घडवायचाय, तुमचा आशीर्वाद हवाय'

googlenewsNext

ठाणे - आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या चौथ्या टप्प्यातील तिसरा दिवस आहे. आदित्य ठाकरे आज पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे बोलत होते. मी 92 मतदारसंघात फिरलो असून साधारण साडे पाच हजार किमी फिरलोय. लोकांचा विश्वास महत्त्वाचा असतो, निवडणुकीनंतर राजकीय भेदभाव ठेवायचा नसतो. आपल्याला मते न दिलेल्यांचेही काम करायची असतात, असे मला माझ्या वडिलांनी सांगितलं, असे आदित्य ठाकरेंनी म्हटल. तसेच, मला नवा महाराष्ट्र घडवायचा असून तरुणांसाठी बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र घडवायचाय, असेही आदित्य म्हणाले. 

जनआर्शीर्वाद यात्रा मी दरवर्षी काढणार आहे, लोकांना गावागावात जाऊन भेटणार आहे. मी जनआशार्वाद यात्रेच्या माध्यमातून तुमचे आशीर्वाद मागत आहे. मला नवा महाराष्ट्र घडवायचाय. मला भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र घडवायचाय, मला बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र घडवायचाय, मला कर्जमुक्त, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवायचंय. मला सुजलांम सुफलाम महाराष्ट्र घडवायचाय, मला भगवा महाराष्ट्र घडवायचाय. मला तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचाय. तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं, त्यासाठी मला नवा महाराष्ट्र घडवायचाय, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी बोईसर येथील नागरिकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. तसेच, आदित्य यांनी मोंदींस्टाईल येथील जनतेला प्रश्न विचारत, मला आशीर्वाद द्याल का, मी तुम्हाला विचारतोय मला नवा महाराष्ट्र घडवायचा ना, असे म्हणत लोकांची मने जाणून घेतली. 

महाराष्ट्रात शिवशाही निर्माण करायचीय, शिवशाही म्हणजे जनतेची काम तात्काळ झाली पाहिजेत, लोकांना कुठल्याही अडचणी येता कामा नयेत, याला शिवशाही म्हणतात, असे आदित्य यांनी म्हटले. मी आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी ही जनआशीर्वाद यात्रा काढली नसून लोकसभा निवडणुकीत तुम्ही शिवसेनेवर आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे आभार मानायला मी आलोय, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी मी आपला ऋणी असल्याचे म्हटले. 
 

Web Title: 'I want to create unemployment free Maharashtra, I want your blessing', Aaditya thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.