राजकीय फायद्यासाठी पाणी ताेेडणाऱ्यांची हाडे मोडेन; जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 06:45 AM2022-03-15T06:45:48+5:302022-03-15T06:45:57+5:30

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेला इशारा

I will break the bones of those who use water for political gain; Minister Jitendra Awhad's warning to Shiv Sena | राजकीय फायद्यासाठी पाणी ताेेडणाऱ्यांची हाडे मोडेन; जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेला इशारा

राजकीय फायद्यासाठी पाणी ताेेडणाऱ्यांची हाडे मोडेन; जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेला इशारा

Next

ठाणे :  ‘एखाद्या विभागातून मते मिळाली नाही म्हणून पाणी बंद करण्याचे घाणेरडे राजकारण कधीच केले नाही. करीतही नाही; पण पाण्याच्या टाकीसाठी निधी आणि जागा आपण मिळविल्यानंतर त्याचे श्रेय जर कोणी केवळ महापालिकेत आपली सत्ता आहे म्हणून घेणार असेल तर जनता अशा बाबींवर विश्वास ठेवत नसते. मात्र, यापुढे राजकारणासाठी सर्वसामान्यांचा पाणीपुरवठा खंडित केला तर मी त्यांची हाडे मोडेन,’ असा सज्जड इशारा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे नाव न घेता आपल्या विरोधकांना रविवारी रात्री दिला. 

कळव्यातील वाघोबानगरमधील कारगील परिसरात २० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. येत्या महिनाभरात परिसरातील सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल तसेच या टाकीसाठी जागा देणारे आदिवासी, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि सध्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्यासह पालिकेचे अभियंता गोसावी यांचेही आव्हाड यांनी विशेष आभार मानले.

वाघोबानगरवासीयांनी पहिल्याच वेळी आपल्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणले. त्यामुळेच या भागातील रहिवाशांसाठी पाणी, रस्ते अशा सर्वच मूलभूत सुविधा पुरविल्या जातील, त्यामुळे तुमच्या घरांच्या किमती निश्चितच वाढतील; परंतु आपली घरे विकून पुन्हा दुसरीकडे झोपड्या बांधू नका, असा कळकळीचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 

 केवळ विकासाचे काम
मते मिळाली नाही म्हणून पाणी बंद करण्याचे घाणेरडे राजकारण आपण कधीच केले नाही; परंतु असे प्रकार भास्करनगर, पौंडपाडा भागात घडतात. व्हॉल्व्ह बंद करून, शौचालयांना लॉक लावण्याचे राजकारण मी केले नाही. लोक घाबरून मते देतीलही; परंतु त्यांचे आशीर्वाद मिळणार नाहीत. मात्र, असे कृत्य करणाऱ्यांची मी हाडे मोडेन, असे पत्रकांराशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले.

शिवसैनिकांनी केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
शिवसेनेचे शाखाप्रमुख अंकुश गुरव, अक्षय अंकुश गुरव, उपशाखाप्रमुख रामअवतार यादव, संजय चौगुले, इस्माईल हक, दिलीप रजक, राहुल सिंग, संदीप शर्मा, नीतेश गौड, राहुल दुबे  आणि राजेश राजभर या शिवसैनिकांनी आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पाण्याच्या टाकीसाठी जागा देणारे गणेश भगत यांचाही यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

Read in English

Web Title: I will break the bones of those who use water for political gain; Minister Jitendra Awhad's warning to Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.